मावळ : नववर्ष सुरु (New Year 2025) होण्यास काही तास शिल्लक राहिले आहेत. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण पर्यटन स्थळांना भेट देत आहेत. यावेळी मोठ्या संख्येने मुंबईकर नजीक असणारे पर्यटन स्थळ लोणावळा (Lonavala) येथे भेट देतात. त्यामुळे लोणावळ्यात थर्टी फस्ट साजरी (31st Celebration) करायला जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
प्रशासनाने थर्टी फस्टच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणांवर बंदी घातली आहे. लोणावळ्यात फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी वेगवेगळे स्पॉट आहे. त्यामुळे याठिकाणी पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. मात्र थर्टी फार्स्टच्या पार्श्वभूमीवर लोणावळा येथील टायगर पॉईंट, लायन्स पॉईंटवर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. हा नियम ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी रोजी लागू असणार आहे, असे आदेश वडगाव मावळ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
दरम्यान, लोणावळा येथील टायगर पॉईंट व लायन्स पॉईंट हे सन सेट पाहण्यासाठी चांगले ठिकाण आहे. यामुळे दरवर्षी याठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. मात्र यंदा याठिाकणी बंदी असल्यामुळे २०२४ वर्षाचा शेवटचा सनसेट पर्यटकांना पाहता येणार नाही.
श्रद्धा कपूर, कंगना रणावत, अनुपम खेर, मधुर भंडारकर, वरुण कोनिडेला यांच्यासह अनेक कलाकारांनी भारतीय जवानांप्रती…
मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…
बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…
सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…