इंदूर : इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान असताना ‘हम दो, हमारे दो’ अशी घोषणा दिली. ही घोषणा हिंदू समाजाने अंमलात आणली पण देशातील इतर धर्मियांनी ही योजना अंमलात आणणे टाळले. आज एका धर्मियांची लोकसंख्या वाढत असताना हिंदूंच्या लोकसंख्येत घट होत असल्याचे चित्र आहे. ही चिंतेची बाब आहे, असे जैन मुनी विनम्र सागर महाराज म्हणाले. हिंदूंमध्ये प्रामुख्याने आदिवासींचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतरण केले जात आहे. दिशाभूल करणारी माहिती देऊन, कधी धाक दाखवून तर कधी प्रलोभने दाखवून धर्मांतरण केले जात आहे.
जगात मुसलमानांचे ५० आणि ख्रिश्चनांचे १०० देश आहेत. भारतात बहुसंख्य हिंदू आहेत. भारतीयांनी त्यांचा २५ डिसेंबर हा आपलासा केला. एक सण म्हणून आनंदाने साजरा करायला सुरुवात केली. ज्यांचा गुरु किंवा देव या देशात जन्मला नाही त्यांचा २५ डिसेंबर आपण सर्वधर्म समभाव म्हणून साजरा करतो. प्रत्यक्षात २५ डिसेंबरच्या माध्यमातून आणि इतर वेगवेगळ्या प्रयत्नांतून हिंदू संस्कृती नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हिंदूंनी हे प्रकार ओळखणे आणि याला आळा घालणे आवश्यक आहे, असे जैन मुनी विनम्र सागर महाराज म्हणाले.
मागील काही दिवसांपासून अनेक संतमहंत, कथावाचक, प्रवचनकार हिंदू संस्कृतीच्या रक्षणासाठी एकजूट होण्याचा संदेश देत आहेत. आता जैन मुनी पण हिंदू संस्कृतीच्या रक्षणासाठी सक्रीय होण्यास सांगत आहेत. जैन मुनी विनम्र सागर महाराज यांनी इंदूरच्या कार्यक्रमात बोलताना थेट माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या घोषणेचा उल्लेख केल्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…
मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…