New Year Party : ख्रिसमस व न्यू इयर निमित्त लायसन्स काढा, खूशाल प्या!

Share

ख्रिसमस व न्यू इयर निमित्त मद्यविक्रीस उशिरापर्यत शासनाने दिली परवानगी

मुंबई : नाताळ (ख्रिसमस) व नववर्षानिमित्ताने (३१ डिसेंबर) (New Year Party) विदेशी मद्य किरकोळ विक्रीची, बियर विक्रीची, परवाना कक्ष, क्लब परवाना असलेली तसेच मद्य विक्रीची दुकाने २४ डिसेंबर, २५ डिसेंबर आणि ३१ डिसेंबरला निर्धारित वेळेनंतर रात्री १०.३० ते दुसऱ्या दिवशी पहाटे १ वाजेपर्यंत तर काही दुकाने पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास शासनाने परवानगी दिली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने यासंदर्भात जारी केलेल्या पत्रकात स्पष्ट केले आहे.

यामध्ये एफएल -२ (विदेशी मद्य किरकोळ विक्रीचे दुकान), एफएलबीआर -२ (बंद बाटलीतून बीअर विक्री) दुकाने रात्री १०:३० ते दुसऱ्या दिवशी पहाटे १ वाजेपर्यंत तर एफएल -३ (परवाना कक्ष) असलेली मद्यविक्रीची दुकाने आणि एफएल -४ (क्लब परवाना असलेली मध्यविक्रीची दुकाने) रात्री ११.३० ते दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजेपर्यंत आणि सीएल -३ प्रकारातील मद्यविक्रीची परवाना दुकाने अ व ब वर्गाच्या नगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते दुसऱ्या दिवशी पहाटे १ वाजेपर्यंत व इतर ठिकाणी रात्री १० ते दुसऱ्या दिवशी पहाटे १ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.

यासोबतच या दोन्ही सणाला साजरे करताना मद्य सेवन करताना आवश्यक परवाना सोबत बाळगण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

गेल्या वर्षभरात अशा पद्धतीने अनधिकृतपणे मद्य प्राशन करताना आढळलेल्या पाच प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे या संदर्भात काळजी घेण्याचे आवाहन विभागाने केले आहे.

३१ डिसेंबर व नववर्षाच्या स्वागतार्थ पार्टी अथवा मेजवानी आयोजित करायची असेल व मद्यसेवनाचे आयोजन करायचे असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने एक दिवसाच्या विशेष परवानाची तात्काळ सोय उपलब्ध आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन एक दिवसाचा परवाना मिळू शकतो, असेही विभागाने कळविले आहे. यासाठी एक्साईज सर्विस महा ऑनलाईन या संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत या काळात सहा पथके तयार करण्यात आली असून ही सहा पथके मद्य निर्मितीमध्ये विक्री व वाहतुकीवर विशेष लक्ष देणार आहे.

पहाटे पाच पर्यंत परमिट रूमला नववर्षाच्या स्वागताला परवानगी देण्यात आली आहे . मात्र अवैध धाबे, हॉटेल, खानावळ, रिसॉर्ट या ठिकाणी होणाऱ्या पार्ट्यांवर विभागाचे लक्ष राहणार असून विनापरवानगी मालकाने परवानगी दिल्यास मालकावर, चालकावर तसेच मद्यप्राशन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल,असेही राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश पाटील यांनी कळविले आहे.

नागरिकांनी ख्रिसमस व ३१ डिसेंबर नववर्षाचे स्वागत नियमांचे पालन करून साजरे करावे, तसेच सार्वजनिक शांततेस बाधा न पोचविता अधिकृत लायसन्स जवळ बाळगून मद्य सेवन करावे व अनधिकृत ठिकाणी सण उत्सव साजरे करण्यास जाऊ नये, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने जारी केलेल्या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

Recent Posts

मुंबईच्या विमानतळाजवळ अज्ञात ड्रोनच्या घिरट्या, उडाली खळबळ!

मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…

1 hour ago

India Pakistan War : पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताचं सडेतोड उत्तर!

पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…

1 hour ago

भारताकडे तेल, गॅसचा पुरेसा साठा

नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…

1 hour ago

IPL 2025 स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित

नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…

2 hours ago

मुंबईत मध्य रेल्वेच्या ट्रान्स-हार्बर मार्गावर प्रवाशांची गैरसोय, स्टेशनवर कामाला जाणाऱ्यांची गर्दी

मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली.  ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…

2 hours ago

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

4 hours ago