नवी दिल्ली : भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर उद्या, मंगळवारपासून अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत ते 24 ते 29 डिसेंबर दरम्यान अमेरिका दौऱ्यावर असतील. या दौऱ्यात दोन्ही राष्ट्रांमध्ये द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. केंद्रीय मंत्री जयशंकर यांच्या अमेरिका दौऱ्याची परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी करुन माहिती दिली.
यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, परराष्ट्रमंत्री सुब्रमण्यम जयशंकर महत्त्वाच्या द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी अमेरिकेला भेट देतील. या भेटीदरम्यान, अमेरिकेतील भारताच्या कौन्सुल जनरल्सच्या परिषदेचे अध्यक्षस्थान देखील ते भूषणवणार आहेत.
यापूर्वी 19 डिसेंबर रोजी, भारतातील अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेट्टी यांनी दोन्ही देशांच्या भागीदारीच्या संभाव्यतेवर प्रकाश टाकला. दोन्ही देशांमधील व्यापार वाढवण्यावर भर दिला जाणार असल्याचे गार्सेट्टी यांनी सांगितले. या दरम्यान, परराष्ट्र मंत्र्यांचा अमेरिका दौरा हा महत्वाचा मानला जात आहे.
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…