मुंबई: पाकिस्तानच्या यजमानपदाखालील पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५च्या(Champions Trophy 2025) वेळापत्रकाचा खुलासा झाला आहे. अशातच चाहत्यांसमोर हे ही स्पष्ट झाले आहे की भारत-पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला कोणत्या मैदानावर खेळवला जाणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील वर्षाच्या सुरूवातीला फेब्रुवारी आणि मार्चमध्ये खेळवली जाणार आहे. आयससीने आधीच स्पष्ट केले होते की ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलप्रमाणे असणार आहे. यात भारत आपला सामना दुसऱ्या देशात खेळेल. आणि घडले असेच काही.
मिडिया वृत्तानुसार भारतीय संघ सर्व सामने दुबईत खेळणार आहे. अशातच भारत-पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला याच मैदानावर होऊ शकतो. जर भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचला तर चॅम्पियन्स ट्रॉफीचे सेमीफायनल आणि फायनल सामनेही यूएईमध्ये होणे निश्चित मानले जात आहे.
टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात २३ फेब्रुवारीला सामना खेळवला जाऊ शकतो. हा सामना दुबईत रंगू शकतो. दुबईचे स्टेडियम त्याच्या इतर स्टेडियमच्या तुलनेत मोठे आहे. दरम्यान या मैदानावर सामना होण्याची शक्यता अधिक आहे.
आतापर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक अधिकृतरित्या जाहीर झालेले नाही. मात्र मिडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की भारत-पाकिस्तान यांच्यात २३ फेब्रुवारीला सामना खेळवला जाऊ शकतो. तर स्पर्धेतील टीम इंडियाचा पहिला सामना बांगलादेशविरुद्ध असू शकतो.
मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…
बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…
सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…
देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…