काँग्रेसने डॉ. आंबेडकरांच्या मृत्यूनंतरही त्यांची अवहेलना करण्याची संधी सोडली नाही – एकनाथ शिंदे

Share

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर त्यांच्या चिरस्मारकासाठी गिरगाव चौपाटीच्या जागेची मागणी करण्यात आली होती. मात्र ती जागा तत्कालिन काँग्रेस सरकारने दिली नाही. अखेर दादर चौपाटीजवळील बाँबे पोर्ट ट्रस्टच्या जागेवर हे स्मारक उभे राहिले. काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकराना सातत्याने अपमानित केलेच पण मृत्यूनंतरही त्यांची अवहेलना करण्याची संधी सोडली नाही असा घणाघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना त्यांनी हे मत व्यक्त केले.

याबाबतची वस्तुस्थिती मांडताना, महाराष्ट्र शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य डॉ. योगिराज बागुल यांनी त्यांच्या ‘आठवणीतले बाबासाहेब’ या ग्रंथामध्ये ही बाब नमूद केली असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. आपल्या म्हणण्याला पुष्टी देताना, शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या ‘जनता’ या नियतकालिकाच्या ७ जुलै १९३४ रोजीच्या अंकामध्ये काँग्रेस ही भांडवलदार आणि जमीनदारांची संस्था असल्याचा उल्लेख असल्याचे दाखवून दिले.

https://prahaar.in/2024/12/21/state-government-portfolio-allocation-announced/

ती एनकेन प्रकारे त्यांचे हितसंबंध आणि त्यांची हुकूमत टिकवून ठेवण्यासाठी काम करणारी संस्था आहे असे मत बाबासाहेबांनीच या पुस्तकात व्यक्त केले असल्याचे दाखवून दिले. महायुती सरकारला डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा संविधानाबद्दलचे प्रेम अन्य कुणी शिकवण्याची गरज नसल्याचे सांगितले. काँग्रेसचे दलित बांधवांविषयी कायमच दुटप्पीपणाचे धोरण राहिले आहे. खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच काँग्रेस हे जळते घर आहे त्यापासून दूर राहा असे सांगितले असल्याची आठवण त्यांनी करून दिली.

काँग्रेसने सातत्याने बाबासाहेबांचा अपमान केला आहे. दोन वेळा कटकारस्थान करून काँग्रेसनेच बाबासाहेबांना निवडणुकीत हरवलं होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात कायदेमंत्री असूनही त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा का दिला? याची कारणे तपासली मग काँग्रेसने बाबासाहेबांना कसे अपमानित केले ते आपल्या लक्षात येईल असे शिंदे यांनी सांगितले.

Recent Posts

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

4 minutes ago

पाकिस्तानच्या लष्करात बंडखोरी!असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं

मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…

18 minutes ago

High alert in Mumbai: मुंबईवर हल्ला होण्याची शक्यता; हायअलर्ट जारी

मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…

33 minutes ago

India Pakistan war : भारत-पाकिस्तान यांच्यातील वादामध्ये हस्तक्षेप करणार नाही, अमेरिकेचे मोठे विधान

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…

1 hour ago

India-Pakistan War: राजौरी-पूंछमध्ये LOC वर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये रात्रभर ब्लॅकआऊट

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…

2 hours ago

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

6 hours ago