Ram Shinde : विधान परिषद सभापतीपदी राम शिंदे यांची एकमताने निवड

Share

नागपूर : भाजपचे आमदार आणि माजी मंत्री राम शिंदे यांची विधानपरिषद सभापतीपदी एकमताने निवड करण्यात आली. विधानपरिषदेमध्ये आज सभापतीपदाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासोबत सर्व नेत्यांनी राम शिंदे यांना सभापतींच्या खुर्चीवर आसनस्थ केले. तसेच सर्वांनी शुभेच्छा दिल्या.

शिवसेना नेत्या, उपसभापती निलम गोऱ्हे या विधानपरिषदेच्या सभापती पदासाठी इच्छुक होत्या. विधानपरिषदेचे सभापतीपद आपल्याला मिळावे, यासाठी शिवसेनेने जोरदार प्रयत्न केले होते. मात्र सभागृहातील संख्याबळामुळे भाजपने स्वत:कडे सभापतीपद ठेवत शिवसेनेला धक्का दिला आहे.

राम शिंदे यांना देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाते. ते २०१४ मध्ये विधानसभेवर निवडून आले, त्यांनी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात मंत्रिपदाची जबाबदारी पार पाडली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादीचे (शरद पवार) उमेदवार रोहित पवार यांच्याकडून राम शिंदे यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांना भाजपाकडून विधानपरिषद सदस्यपदी निवड करण्यात आली. नुकत्याच झालेल्या विधानसभा २०२४ च्या निवडणुकीत पुन्हा एकदा रोहित पवार यांच्याकडून त्यांचा अवघ्या १२०० मतांनी त्यांचा पराभव झाला.

सभापती निवडीवर काय म्हणाले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री ??

अतिशय शिस्तीने आणि संवेदनशीलतेने कार्यभार चालवण्याचा विश्वास : देवेंद्र फडणवीस

सभापती निवडीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राम शिंदे सर आहेत. त्यामुळे क्लास कसा चालवायचा याची त्यांना सवय आहे. मला विश्वास आहे की, आपण अतिशय शिस्तीने आणि संवेदनशीलतेने कार्यभार चालवाल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित त्यांच्या कुटुंबातील नवव्या पिढीतील व्यक्ती सभागृहात खुर्चीवर बसत आहे. एकप्रकारे त्यांना वाहिलेली ही श्रद्धांजली आहे. मुघलांनी ज्यावेळी हिंदू मंदिर संपवली होती, त्यावेळी मंदिर उभारणीचे काम अहिल्यादेवी होळकर यांनी केले होते. सरपंच पदापासून सुरू झालेला आपला प्रवास आता सभागृहाच्या सर्वोच पदापर्यंत आला आहे. चौंडी गावाचे सरपंच म्हणून आपण काम केले आहे. कधी कधी वाईटातून चांगलं होतं असतं. आपण थोड्या मतांनी विधानसभेला पडलात. परंतु, कदाचित नियतीच्या मनात तुम्हाला विधानपरिषद सभापती करायचं असेल त्यामुळे नियतीने हे केले असेल, असे त्यांनी यावेळी म्हटले.

रामभाऊ कुणावर अन्याय करणार नाहीत : एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आपण दोघे शिंदे आहोत, त्यामुळे काही अडचण नाही. रामभाऊ कुणावर अन्याय करणार नाहीत. सर्वांचे लाडके भाऊ ते आहेत. नावात राम आणि आडनावात शिंदे आहेत. त्यामुळे सर्वांच ऐकून घेतील आणि काम पण करतील.

…तर गिरीश महाजनांचं मंत्रिपद गेलं असतं : अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, या विधीमंडळाचे वैशिष्ट्य पाहील तर अनेक तरुण आमदार निवडून आले आहेत. विधानसभेचे अध्यक्ष देखील तरुण आहेत तर परिषदेत देखील तरुण सभापती बसवले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आपल्याबद्दल सांगितलं मात्र आपण अजूनही चाळीशीत आहात, असेच वाटत आहे. मधल्या काळात राम शिंदे सर तुम्ही म्हणालात अजित पवारांनी माझ्या इथ सभा घेतली नाही. माझ्यामुळे पराभव झाला असं आपण बोललात. मात्र जे झालं ते चांगल झालं आपण सभापती झालात. कदाचित आपण निवडून आला असता आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मनात तुम्हाला कॅबिनेट मंत्रिपद द्यावं वाटलं असतं तर गिरीश महाजनांच मंत्रिपद गेलं असतं.

Tags: ram shinde

Recent Posts

मुंबईच्या विमानतळाजवळ अज्ञात ड्रोनच्या घिरट्या, उडाली खळबळ!

मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…

1 hour ago

India Pakistan War : पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताचं सडेतोड उत्तर!

पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…

1 hour ago

भारताकडे तेल, गॅसचा पुरेसा साठा

नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…

1 hour ago

IPL 2025 स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित

नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…

2 hours ago

मुंबईत मध्य रेल्वेच्या ट्रान्स-हार्बर मार्गावर प्रवाशांची गैरसोय, स्टेशनवर कामाला जाणाऱ्यांची गर्दी

मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली.  ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…

2 hours ago

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

4 hours ago