Air Pollution : बिल्डरांनो, वायू प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करा, अन्यथा…

Share

बांधकामांमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी प्रमाण कार्यप्रणालीच्या पालनाची सूचना

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी बांधकाम व पुनर्विकासाची कामे सुरू आहेत. या कामांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण (air pollution) व ब्लास्टिंगच्या अनुषंगाने नागरिकांकडून व लोकप्रतिनिधींकडून वारंवार तक्रारी प्राप्त होत आहेत.

मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी स्वतःहुन दाखल करुन घेतलेली (Suo Moto) जनहित याचिका क्र.३ मध्ये उच्च न्यायालयाने दि. ११‍ डिसेंबर २०२३ रोजी पारित केलेल्या आदेशानुसार वायू प्रदूषण कमी करण्याबाबत आदेश दिलेले आहेत. त्यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी व उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने “मानक कार्यप्रणाली” तयार करण्याकरिता महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या २४ एप्रिल २०२४ रोजीच्या आदेशान्वये नवी मुंबई महानगरपालिका स्तरावर अतिरिक्त आयुक्त २ यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ सदस्यांची समिती गठीत करण्यात आली होती.

सदर समितीने विविध बैठका घेऊन नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बांधकाम परवानगी धारकांनी विकासकांनी / कंत्राटदारानी अवलंबवयाच्या ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण व एकापेक्षा जास्त खोलीच्या बेसमेंटबाबत उत्खनन / ब्लास्टींग करताना घ्यावयाच्या खबरदारीबाबत मानक कार्यप्रणाली (SOP) व बांधकाम प्रकल्पांच्या साईटवर होणा-या वायू व ध्वनी प्रदूषण – दंडात्मक कारवाईबाबतच्या प्रस्तावास आयुक्त तथा प्रशासक, नवी मुंबई महानगरपालिका यांनी २६ जुलै २०२४ रोजी, ठराव क्र. ६४५२ अन्वये मंजूरी दिलेली आहे.

त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी कामांमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण व ब्लास्टींगकरिता अवलंबवायची “मानक कार्यप्रणाली” (“Standard Operating Procedure (SOP)”) आणि बांधकाम प्रकल्पांच्या साईटवर होणा-या वायू व ध्वनी प्रदूषण – दंडात्मक कारवाईबाबतचे परिपत्रक तयार करण्यात आले आहे. त्यास आयुक्त तथा प्रशासक यांची ०१ ऑगस्ट २०२४ रोजी मान्यता प्राप्त झालेली आहे.

या परिपत्रकानुसार सुरु असलेल्या बांधकाम तसेच पुनर्बांधकाम प्रकल्पावर नियंत्रण करण्यासाठी विशेष पथकाची (Task Force) नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानुसार संबंधित विभाग अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील ज्या ठिकाणी बांधकामाचे तोडकाम / खोदकाम / बांधकाम सुरू आहे, अशा सर्व प्रकल्पांच्या जागी जोत्यापर्यंतचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत प्रत्येक आठवड्यातून किमान एकदा प्रत्यक्ष पाहणी करुन तसा अद्ययावत अहवाल सहाय्यक संचालक, नगररचना यांना सादर करावयाचा आहे.

बांधकाम / पुनर्बांधकाम प्रकल्पांमध्ये संबंधितांकडून अटी व शर्तींचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास महापालिका आयुक्त यांच्या पूर्वपरवानगीने सदर बांधकाम परवानगी धारकाविरुध्द एमआरटीपी कायदा १९६६ व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ अन्वये तसेच परिपत्रकातील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी.

तरी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व विकासक / नागरिक यांना महानगरपालिकेच्या वतीने पुन:श्च जाहीर प्रकटन करुन सूचित करण्यात येत आहे की, नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये बांधकाम प्रकल्प / विकासकामांमुळे होणारे ध्वनी व वायू प्रदूषणास आळा घालण्यासाठी त्याचप्रमाणे खोदकाम / ब्लास्टींगमुळे नागरिकांना त्रास होऊ नये यादृष्टीने तसेच प्रकल्पांच्या ठिकाणी होणाऱ्या संभाव्य दूर्घटना टाळण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेकडून तयार करण्यात आलेले सविस्तर परिपत्रक नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, याची नोंद घेण्यात यावी व त्याचे पालन करावे.

Recent Posts

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

3 hours ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

3 hours ago

रोहित शर्मा:रॅग्ज टु रिचेस कहाणी

उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…

3 hours ago

India Pakistan War News : पाकड्यांना भारताचे जोरदार प्रत्युत्तर! कराची बेचिराख!

सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…

3 hours ago

रेस्टॉरंटमधील सर्व्हिस चार्ज: एक अनुचित वसुली

मधुसूदन  जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…

4 hours ago

India-Pakistan war: भारताच्या कारवाईला अमेरिकेचे समर्थन, पाकिस्तानला फटकारले

नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…

5 hours ago