Friday, May 9, 2025
HomeदेशPM Modi : संविधानाला नख लावणाऱ्या काँग्रेसने लोकशाहीचा गळा घोटला

PM Modi : संविधानाला नख लावणाऱ्या काँग्रेसने लोकशाहीचा गळा घोटला

पंतप्रधान नरेंद्र मोदींची पंडीत नेहरु, इंदिरा गांधींच्या निर्णयावर टीका

नवी दिल्ली : जेव्हा देश संविधानाची २५ वर्ष पूर्ण केली होती त्यावेळी आमच्या देशात संविधानाला नख लावण्यात आले. देशात आणीबाणी लावण्यात आली. पत्रकारितेचे स्वातंत्र्य संपवण्यात आले, काँग्रेसचे हे पाप कधी धुतले जाणार नाही. काँग्रेसच्या एका कुटुंबानं संविधानाला धक्का देण्यामध्ये गेल्या ५५ वर्षात काही सोडले नाही. काँग्रेसने लोकशाहीचा गळा घोटला. आणीबाणीच्या काळात देशाला तुरुंग बनवण्यात आले होते, असा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी पंडीत नेहरु व इंदिरा गांधींच्या निर्णयावर टीका केली.

लोकसभेत संविधानाच्या ७५ वर्षांच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सरकारच्या निर्णयांची माहिती दिली. भारताच्या संविधानाच्या ७५व्या वर्षानिमित्त लोकसभेतील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर दिलं. यावेळी बोलताना मोदींनी पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी यांच्यासह काँग्रेसवर सडकून टीका केली. आणीबाणीच्या दिवसांचीही आठवण मोदींनी काढली.

काँग्रेसच्या एका कुटुंबाने संविधानाला धक्का दिल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, मी संविधानामुळे इथपर्यंत पोहोचलो आहे, संविधानामुळे आमच्यासारखे लोक पंतप्रधान झाले. जवाहरलाल नेहरु यांनी १९५१ मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला केला. काही लोकांनी अपयशाचे दु:ख प्रकट केले. जवाहरलाल नेहरु यांनी त्यावेळी मुख्यमंत्र्यांना चिठ्ठी लिहून मुख्यमंत्र्यांना म्हटले की, संविधान आपल्या रस्त्यात आले तर कोणत्याही परिस्थितीत संविधानात बदल करावा लागेल, असे म्हटले होते. काँग्रेसने वेळोवेळी संविधानावर हल्ले केले. ६० वर्षात ७५ वेळा संविधान बदलण्यात आले. जवाहरलाल नेहरु यांनी १९५१ मध्ये मागच्या दाराने संविधान बदलले. नेहरु आपले संविधान चालवत होते. इंदिरा गांधी यांनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय बदलला, आणीबाणी लागू करुन अधिकार हिरावून घेण्यात आले. न्यायव्यवस्थेचा गळा घोटण्यात आला. खुर्ची वाचवण्यासाठी आणीबाणी लावण्यात आली, असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला.

आणीबाणीच्या काळात लोकशाही संपविण्याचे काम

सर्व शंका दूर करत संविधान आपल्याला इथंपर्यंत घेऊन आले. भारताला लोकशाहीची जननी म्हणून ओळखले जाते. महान देशासाठी लोकशाहीची व्यवस्था नवी नाही. आज सर्वच क्षेत्रात महिला या आघाडीवर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रत्येकाने आभार मानले पाहिजेत. महिलाशक्तीला अधिक सशक्त करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. महिलांबाबतचे कायदे आम्ही आणले. देशाच्या एकतेत ३७० कलम अडसर होते. आयुष्मान कार्डचा गोरगरीबांना मोठा फायदा झाला. आमच्या संविधान एकात्मता आणि एकता आहे. भारताला विकसित करण्याचा संकल्प आहे. संविधान निर्मात्यांनी आम्हाला दिशा दाखवली. स्वातंत्र्यानंतर देशाच्या एकात्मतेवर प्रहार झाला. देशातील एकता ही आमची प्राथमिकता आहे. आणीबाणीच्या काळात लोकशाही संपवण्याचे काम झाले असल्याची टीका पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केली.

संविधानाची हत्तीवरुन मिरवणूक काढली होती

२६ नोव्हेंबरला देशभरात संविधानाचे पन्नासावे वर्षे साजरे केले. अटल बिहारी वाजपेयींनी पंतप्रधानांच्या नात्याने एकतेचा संदेश दिला होता. संविधानाला ६० वर्षे झाल्यानंतर आम्ही गुजरातमध्ये ते वर्ष साजरे केले. तेव्हा आम्ही संविधान ग्रंथाची हत्तीच्या अंबारीवरुन मिरवणूक काढली. राज्याचे मुख्यमंत्री संविधानाच्या खाली, हत्तीच्या बाजूला रस्त्यावरुन चालत होता. देशाला संविधानाचे महत्त्व कळावे, यासाठी प्रयत्न करत होता. हे सौभाग्य मला मिळाले, अशीही आठवण मोदींनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -