नवी दिल्ली : बँक खातेधारकांना आता त्यांच्या खात्यामध्ये ४ नॉमिनी (वारसदार) ठेवण्याची परवानगी राहणार आहे. बँकिंग दुरूस्ती विधेयक आज, बुधवारी लोकसभेत मंजुर झाले. या विधेयकावर बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही माहिती दिली.
अर्थमंत्र्यांनी सभागृहात दिलेल्या माहितीनुसार कोरोना साथरोगाच्या काळात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या बँक खात्यांवर अनेक लोक वारस म्हणून दावा करत होते. अशा स्थितीत बँकांना अनेक प्रकारच्या कायदेशीर वादांना सामोरे जावे लागले. त्यामुळे हा निर्णय घेण्याची गरज भासली आहे. आत्तापर्यंत खातेदार एक नॉमिनी जोडू शकत होता, तर नवीन नियमानुसार, तुम्ही तुमच्या बँक खात्यात 4 नॉमिनी जोडू शकाल.
याशिवाय, खातेदार कोणत्या नॉमिनीला खात्यात जमा केलेल्या रकमेपैकी किती टक्के रक्कम देऊ इच्छित आहे हे देखील ठरवू शकेल. जर तुम्हाला तुमच्या बँक खात्यात एकापेक्षा जास्त नॉमिनी हवे असतील तर तुम्ही खाते उघडण्यासाठी फॉर्म भरता तेव्हा तुम्हाला तेथे चार नॉमिनी भरण्याचा पर्याय मिळेल. तुमच्या मृत्यूनंतर, खात्यातील रक्कम नियमानुसार तुम्ही निवडलेल्या नॉमिनीला दिली जाईल असे सीतारामन यांनी स्पष्ट केले.
श्रद्धा कपूर, कंगना रणावत, अनुपम खेर, मधुर भंडारकर, वरुण कोनिडेला यांच्यासह अनेक कलाकारांनी भारतीय जवानांप्रती…
मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…
बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…
सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…