नवी दिल्ली : दहशतवाद आणि खेळ हा एकत्र होऊच शकत नाही, अशा शब्दात परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर केली. त्यामुळे पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये चॅम्पियन ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले आहे. पण पाकिस्तानमधील सुरक्षेच्या कारणावरून भारताचा क्रिकेट संघ पाकिस्तानला जाणार नाही, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयसीसीला कळविले आहे. या स्पर्धेसंदर्भात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परीषदेची (आयसीसी) आयोजित महत्त्वाच्या बैठकीआधीच भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपली भूमिका जाहीर केली.
प्रवक्ते जैस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, बीसीसीआयने एक निवेदन जारी केले आहे. बोर्डाच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानमध्ये सुरक्षेशी संबंधित समस्या आहेत, त्यामुळे संघ पाकिस्तानात जाणार नाही. आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत. पाकिस्तानमध्ये सुरक्षेचा प्रश्न आहे. सुरक्षेची चिंता आहे आणि म्हणून संघ पाकमध्ये खेळण्यासाठी जाणार नाही, असे जैस्वाल यांनी स्पष्ट केले आहे.
बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या परिस्थितीबद्दल प्रवक्ते रणधीर जैस्वाल म्हणाले, बांगलादेशातील हिंदू आणि अल्पसंख्याकांच्या परिस्थितीबाबत आम्ही विरोध अगदी स्पष्ट केला आहे. आम्ही हा मुद्दा बांगलादेशासमोर मांडला आहे की त्यांनी अल्पसंख्याकांचे रक्षण करणे आणि त्यांच्या हिताचे रक्षण करणे, त्यांचे रक्षण करणे आणि त्यांना सुरक्षा प्रदान करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे.
चिन्मय कृष्णा दासच्या अटकेबद्दलच्या प्रश्नांना उत्तर देताना जैस्वाल म्हणाले, आम्ही इस्कॉनकडे सामाजिक सेवेची जागतिक स्तरावर प्रतिष्ठित संस्था म्हणून पाहतो. चिन्मय दास यांच्या अटकेबाबत आम्ही आमचे म्हणणे मांडले आहे. याबाबत खटले आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू आहेत. आम्ही आशा करतो आणि अपेक्षा करतो की या प्रक्रिया निष्पक्ष, न्याय्य आणि पारदर्शक रीतीने हाताळल्या जातील आणि या व्यक्तींचा आणि संबंधित सर्वांचा पूर्ण आदर सुनिश्चित केला जाईल.
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरसह भारतातील काही राज्यांमध्ये पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला भारत्या एअर सिस्टीमने…
नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरमध्ये ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर आणि ९०हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर…
भारताने पाकिस्तानची ३ विमाने पाडली, जम्मूत दोन जेएफ १७ आणि राजस्थानमध्ये एक एफ १६ पाडले…
धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध धरमशालाच्या हिमाचल प्रदेश…
जम्मू : ‘सुधर जाओ पाकिस्तान’ आता असच म्हणावं लागेल. भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाम…