पुणे: राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघासाठी(Maharashtra Assembly Election) आज एकाच टप्प्यात मतदान होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यातील अनेक नेत्यांची प्रतिष्ठा यंदाच्या निवडणुकीत पणाला लागली आहे. मतदानाच्या आधीच सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार केला होता.
यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक मुद्दा रंगला होता तो बारामतीच्या अजित पवार यांचा. त्यामुळे बारामतीच्या या जागेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा शरद पवार यांच्याशिवाय अजित पवार हे निवडणूक लढवत आहे.
या निवडणुकीसाठी अजित पवार यांनी सकाळीच मतदान केंद्रावर जात मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सुनेत्रा यांनीही मतदान केले. दरम्यान, ही निवडणूक आपल्याला विकासाच्या मुद्द्यावर लढायची होती. जे काही आरोप झाले त्यांची चौकशी केली जाईल असे यावेळी अजित पवार म्हणाले.
बारामतीमधून महायुतीमधून अजित पवार घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्याविरोधात शरद पवारांकडून युगेंद्र पवार यांना तिकीट देण्यात आली आहे. त्यामुळे बारामतीमधून अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत पाहायला मिळू शकते.
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…
मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…