IPL 2025 : आरसीबी कर्णधार पदासाठी केएल नावाची चर्चा!

Share

२०२५ मेगा लिलावासाठी उलटी गिनती सुरू

नवी दिल्ली : आयपीएल २०२५ (IPL 2025) मेगा लिलावासाठी उलटी गिनती सुरू झाली आहे. आयपीएलचा लिलाव २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियातील जेद्दाह येथे होणार आहे. या लिलावात फ्रेंचायझी मोठ्या प्रमाणात बोली लावताना दिसती. केएल राहुल आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) या खेळाडूंचा समावेश आहे. लखनऊ सुपर जायंट्मसधून (Lucknow Super Giants) बाहेर झाल्यानंतरके एल राहुल आयपीएल२०२५ मध्ये कोणत्या संघाचा भाग असेल, यावर सगळ्यंचे लक्ष लागले आहे.

आयपीएल२०२५ च्या मेगा लिलावाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे राहुल आरसीबीमध्ये (RCB) जाऊ शकतो, अशी अफवा वाढत आहे. जिथे त्याने २०१३ मध्ये त्याच्या आयपीएल कारकिर्दीला सुरुवात केली होती. एका मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राहुलला लिलावात खरेदी करण्यासाठी आधीच ३० कोटी रुपयांचे बजेट राखून ठेवले आहे.

केएल राहुल २०१६ पर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला आणि त्याच हंगामात आरसीबीने आयपीएलची अंतिम फेरी गाठली. २०१६ मध्ये सनरायझर्स हैदराबाद बंगळुरूविरुद्ध विजेतेपदाच्या लढतीत होते. त्या सामन्यात एसआरएचने प्रथम खेळताना२०८ धावांची मोठी खेळी केली होती. दुसरीकडे, बंगळुरूला निर्धारित २० षटकांत केवळ २०० धावांपर्यंत मजल मारता आली. त्या सामन्यात विराट कोहलीने ५४ आणि राहुलने ११ धावा केल्या होत्या. राहुलने आयपीएल २०१६ मध्ये १४ सामने खेळताना ३९७ धावा केल्या होत्या.

केएलचे आरसीबीमधून पदार्पण

केएल राहुलने २०१३मध्ये आरसीबीकडून खेळताना आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्याने बेंगळुरूसाठी चार हंगाम खेळले, ज्यामध्ये त्याने १९ सामन्यांमध्ये ४१७ धावा केल्या. आरसीबीने आयपीएल २०२५ साठी विराट कोहली (२१ कोटी), रजत पाटीदार (११ कोटी) आणि यश दयाल यांना ५ कोटी रुपयांना खरेदी केले होते. आरसीबीच्या पर्समध्ये अजूनही ८३ कोटी रुपये शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत या टीमने राहुलसाठी लिलावात ३० कोटी रुपयांपर्यंत बोली लावण्याची तयारी केली असल्याचा दावा केला जात आहे.

Recent Posts

India-Pakistan War: राजौरी-पूंछमध्ये LOC वर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये रात्रभर ब्लॅकआऊट

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…

22 minutes ago

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

5 hours ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

5 hours ago

रोहित शर्मा:रॅग्ज टु रिचेस कहाणी

उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…

5 hours ago

India Pakistan War News : पाकड्यांना भारताचे जोरदार प्रत्युत्तर! कराची बेचिराख!

सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…

5 hours ago

रेस्टॉरंटमधील सर्व्हिस चार्ज: एक अनुचित वसुली

मधुसूदन  जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…

6 hours ago