झाशी: उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये शुक्रवारी रात्री मेडिकल कॉलेजच्या नवजात शिशु विभागात भीषण आग लागली. यात १० नवजात बाळांचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर सकाळी उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक झाशीच्या महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचले आणि घटनेची पाहणी केली.
या अपघाताप्रकरणी उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी तपासाचे आदेश दिले आहेत तसेच जखमींवर उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आर्थिक मदतीसाठी तयार असल्याचे ते म्हणाले. उपमुख्यमंत्री म्हणाले, नवजात बाळांच्या मृत्यूची घटना दुर्देवी आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत मिळून आम्ही बालकांच्या मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहोत.
रुग्णालयात ही आग कशामुळे लागली याचा तपास केला जाईल. यात जे दोषी आढळतील त्यांच्याविरोधात कडक कारवाई केली जाईल. तसेच कोणालाही यात माफ केले जाणार आहे. सरकार बाळांच्या कुटुंबियांसोबत आहे. २४ तासांच्या आत तपासाचा रिपोर्ट येईल. मृत मुलांमध्ये १० पैकी ७ जणांची ओळख पटली आहे. अद्याप ३ बाळांची ओळख पटणे बाकी आहे. गरज पडल्यास डीएनए टेस्ट केली जाईल.
या घटनेबाबत माहिती देताना झांसी सीएमएस सचिन मेहर यांनी सांगितले, महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजच्या एनआयसीयू वॉर्डमध्ये ५४ मुले दाखल होती. यावेळी अचानक आग लागली. ही आग विझवण्याचा प्रयत्न झाला. मात्र अधिकतर मुले ऑक्सिजन सपोर्टवर होती.
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरसह भारतातील काही राज्यांमध्ये पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला भारत्या एअर सिस्टीमने…
नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरमध्ये ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर आणि ९०हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर…