अश्विनीच्या मैत्रीचा गुलाबी प्रवास

Share

युवराज अवसरमल

अश्विनी भावे या अभिनेत्रीने आपल्या अभिनयाने कित्येक वर्ष रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. हीना या हिंदी चित्रपटांमुळे तर तिची ख्याती सातासमुद्रापार गेली. प्रेक्षक तिच्या कलाकृतीची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत असतात. ‘गुलाबी’ हा तिचा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिचा अभिनय पाहण्याची अजून एक संधी तिच्या चाहत्यांना मिळणार आहे. अश्विनीचे शालेय शिक्षण सायनच्या साधना विद्यालयातून झाले. तिची आई तिथे शिक्षिका होती. लहानपणापासून तिला सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेण्याची हौस होती. ती लहानपणापासूनच हरहुन्नरी होती. शाळेतील नृत्य, गायन स्पर्धा, पठण स्पर्धा, हस्तकला स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, आंतर महाविद्यालयीन अभिनय स्पर्धा यामध्ये ती मोठ्या आवडीने भाग घ्यायची. कोणत्याही स्पर्धेत केवळ बक्षिसासाठी तिने कधीच भाग घेतला नाही. तिला प्रथम क्रमांक मिळाला किंवा उत्तेजनार्थ नंबर मिळाला तरी काही फरक पडत नसे, स्पर्धेसाठी तयारी करणे, स्पर्धेत भाग घेणे हे ती आवडीने करीत असे.त्यातच तिला आनंद मिळत होता. तिला पारितोषिके खूप मिळाले. तिचे बारावीपर्यंत शिक्षण एस. आय. एस. सायन-माटुंगा कॉलेजमध्ये झाले, तर पुढील पदवीपर्यंत शिक्षण रुपारेल कॉलेजमधून झाले.
तिथे फिलॉसॉफी या विषयात तिचे पदवीपर्यंत शिक्षण झाले. ती जेव्हा कॉलेजमध्ये गेली तेव्हा ती निर्माते मोहन वाघ यांच्या ‘गगनभेदी’ नाटकात काम करीत होती. त्याचे महिन्याला जवळपास बत्तीस शो असायचे, त्यामुळे तिचे शेड्युल खूप बिझी असायचे. कॉलेजमधील सांस्कृतिक कार्यक्रमात तिला जास्त भाग घेता आला नाही. फक्त कॉलेजमधील गायनाशी संबधित कार्यक्रमात तिने स्वयंसेवक म्हणून काम केले होते.

१९८२ साली निर्माते मोहन वाघ प्रोडक्शनच्या ‘गगनभेदी’ नाटकापासून तिच्या अभिनयाची सुरुवात झाली. प्रा. मधुकर तोरडमल हे या नाटकाचे दिग्दर्शक होते. त्या नाटकामध्ये ते अश्विनीच्या वडिलांचे देखील काम करीत होते. अभिनेत्री वंदना गुप्ते अश्विनीच्या आईचे काम करीत होती. त्यावेळी अश्विनीच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. हे नाटक तिच्यासाठी टर्निंग ठरले. त्या नाटकानंतर तिच्याकडे भरपूर कामे आली. ‘अपने पराये’ ही तिची पहिली मालिका होती. भालजी प्रोडक्शनचा ‘शाब्बास सूनबाई’ हा तिचा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट केल्यानंतर तिला जाणवले की, चित्रपट हे माध्यम तिला जास्त आवडू लागले आहे. त्यामुळे तो चित्रपट देखील ती टर्निंग पॉइंट मानते. त्यानंतर चित्रपट करायचे असे तिचे ठरले. तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट जर कोणता असेल तर तो तिला मिळालेला आर. के. प्रोडक्शनचा ‘हीना’ चित्रपट. या चित्रपटामुळे ती ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाऊ लागली. चित्रपट भरपूर हिट ठरला. त्यातील गाणी खूप गाजली. तिच्या अभिनयाचे कौतुक झाले. ‘गुलाबी’ हा तिचा नवीन चित्रपट येत आहे. आपल्या आजूबाजूला आपण अशा स्त्रिया पाहतो ज्या सतत दुसऱ्यांना काही ना काही देत असतात म्हणजे त्यांच्यामध्ये देण्याची वृत्ती असते. कधी त्या घरातील मुलांना, नवऱ्याला, समाजातील लोकांना प्रेम देतात, त्यामध्ये स्वतःवर प्रेम करण्याचे त्या विसरून जातात. अश्याच एका डॉक्टर बाईची भूमिका ती साकारत आहे. तिचा नवरा मोठा नुरो सर्जन असतो. तिला एक मुलगी असते. कुटुंबातील सगळ्यांशी असलेल्या संबंधावर तिच्या पात्रांची गोष्ट आहे. तिचा स्वभाव खूप मनमिळावू आहे. ही भूमिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असे तिला वाटते. या चित्रपटात काम करताना सहकलाकारासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता असे विचारले असता ती म्हणाली की, शैलेश दातार, श्रुती मराठे, मृणाल कुलकर्णी यांच्यासोबत काम करताना खूप मजा आली. यांच्यासोबत काम करण्याची संधी या अगोदर मला मिळाली नव्हती. प्रथम शैलेशबद्दल बोलते, तो अत्यंत ताकदवान कलाकार आहे. अभिनय ही कला दोन कलाकारांच्या क्रिया व प्रतिक्रियेवर अवलंबून असते. त्यामुळे आमच्या सीनच्या वेळी त्याचाकडून खूप छान प्रतिक्रिया मिळाली. माझे व शैलेशजींचे सीन खूप छान वठले आहेत. श्रुती व मृणाल बरोबर काम करताना मी खूप धमाल केली. आम्ही काम करतोय असे वाटलेच नाही. तिघींच्या व्यक्तिरेखा वेगळ्या आहेत. तीन कसदार कलाकार एकत्र आले की, ते आपल्या भूमिकेशी एकनिष्ट असतात. सृजनशील भाषा, अभिनय करताना मी एन्जॉय केले.

या चित्रपटाचे दिग्दर्शक अभ्यंग सेटवर शांत असायचा, त्यामुळे सेटवरील वातावरण चांगले असायचे. चांगला सीन झाला असेल तर उगाचच तो रिटेक घेत नसायचा. या चित्रपटातील व्यक्तिरेखेतील काही गोष्टीमध्ये व अश्विनीमध्ये साम्य होते, तर काही गोष्टींबाबत भिन्नता होती. समाजातील माणसांचे प्रतिबिंब या चित्रपटामध्ये पाहायला मिळेल, त्यांना येणाऱ्या अडचणी त्या कश्या सोडवतात हे प्रेक्षकांना या चित्रपटातून पाहण्याची संधी मिळणार आहे. या चित्रपटाच्या संगीतामध्ये फ्रेशनेस आहे, शब्द सुंदर आहेत. संगीताने या चित्रपटाचा पोत चांगला झाला आहे. ‘गुलाबी’ हा चित्रपट प्रेक्षकांना आवडेल असा आशावाद अश्विनीने व्यक्त केला. गुलाबी या चित्रपटाच्या यशासाठी व भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !

Recent Posts

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून अंमलबजावणी

सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…

13 minutes ago

Mumbai Metro 3: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीकेसी-वरळी विभागाचे उद्घाटन

मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अ‍ॅक्वा लाईन-३ (Mumbai…

33 minutes ago

प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन सज्ज करण्याचे आदेश

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…

52 minutes ago

काश्मीरच्या रणभूमीत मुंबईचा जवान शहीद!

देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…

55 minutes ago

मुख्यमंत्र्यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

2 hours ago

Dagdu Sheth Ganesh Temple: भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडू शेठ हलवाईची सुरक्षा वाढवली

मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…

2 hours ago