गोऱ्या कातडीचा दरारा… साऊल गोंदणी हुंदका…

Share

ऋतुजा केळकर

यशापयशाच्या तराजूत माणूस कायम डामाडोल होत असतो. मी तर म्हणेन आपण, थेंब-थेंब मध गोळा करून भले मोठे मधाचे पोळे तयार करणाऱ्या मधमाशांना आपण कष्टाने तयार केलेले मधाचे पोळे फोडून माणसे मध पळवून नेतात हे माहिती असूनही त्या परत परत मध तयार करण्यासाठी कायमच सज्ज असतात. तेव्हा हजारोंनी फुले फुलवणाऱ्या झाडांसारखी जिद्द मनात बाळगावी म्हणजे कसे आहे ना की, फुले गळतात, कोमेजून जातात, सारी मुले, माणसे ती खुडून-ओरबाडून नेतात हे माहित असूनही झाडे कायमच बहरत असतात. फळा-फुलांनी लगडून राहतातच. तशी सदैव बहरत राहण्याची, दुसऱ्यांना कायम देत राहण्याची वृत्ती मनात बाळगावी कारण, देणाऱ्याला आयुष्यात कधीच काहीच कमी पडत नाही त्याचे सर्वात महत्त्वाचे कारण की, त्यांच्या डोक्यावर कायम सत्कर्माची छाया असते. म्हणूनच मला असे वाटते की, संभव असंभवतेच्या ऊन पावसात नियोजनबद्धतेने जिद्द बाळगल्यास परिपूर्ण जीवनाचा वसंत ऋतू आपल्या आयुष्यात फुलल्याशिवाय राहत नाही.

एकदा का जीवनाची ‘दिशा’ ठरली की, त्या दिशेने जाण्याची ‘जिद्द’ ही मनात आपोआपच निर्माण होते. पण ‘व्यवस्थापनाच’ काय? मला मान्य आहे उडदामाजी काळे-गोरे सगळीकडेच असतात पण उत्तम व्यवस्थापन ही फक्त ‘यशाचीच गुरूकिल्ली’ नसते‌, तर आज ‘काळाची ही गरज’ आहे हे विसरून चालणार नाही. अर्थातच त्याकरिता उत्तम ‘निर्णय क्षमता’ ही असणे अतिशय गरजेचे आहे. आता क्रिकेटचेच घ्या ना. समोरून आलेला बॉल हा कसा मारला की, फोर किंवा सिक्सर जाईल हे जसे त्या बॅटस्मनने क्षणार्धात ठरवायचे असते. तसेच प्रत्येक प्रसंगात कसे वावरायचे हे ज्याचे त्यानेच वेळच्या वेळी ठरवायचे असते. अर्थातच त्याकरिता ‘चौफेर विचार करण्याची वैचारिक क्षमता’ विकसित करण्याची त्याबरोबरच त्यानुसारच कृती करण्याची सवय आपल्याला लावून घेणे गरजेचे आहे. याकरिता गरज आहे ती एकाग्र चित्ताची. इथे आपल्याला ध्यान साधनेचा खूप उपयोग होतो. ती करत असताना आपल्याला आवडेल, रूचेल त्या देवतेचे रूप चित्ती साठवून ध्यान साधना केल्यास त्याचा विशेष फायदा होतो. अर्थातच त्याकरिता आपल्याला आपल्या आत्म्याच्या, रंगाची पोत ओळखून त्याला योग्य त्या पद्धतीने मुरड घालून सुख-दुःखाचा पिळ आणि मनावर झालेल्या खोल जखमा, व्रण‌ समजून घेऊन अलवारपणे मनाच्या कोनाड्यातील त्या आत्मविश्वासाची विझत चाललेली सहस्त्र निरांजने परत तेवत ठेवता आली पाहिजेत. आपल्याला शुभंकरत्वाचा, मांगल्याचा निर्माता होता आले पाहिजे. या दीपावलीच्या लखलखाटात आतून बाहेरून स्वतःला उजळून टाकता आले पाहिजे. पण जर वासना विकारांच्या निसरड्या भूमीवर पाय रोवून उभे राहताना हृदयातील नात्यांच्या मानापमानाच्या दुखऱ्या तंतूना आपण धरून बसलो तर, या आंधळ्या उपभोगाच्या शामियान्यात आपण अडकून पडू. म्हणूनच स्थळ काळाचे भान राखून तसेच समोरच्याच्या भूमिकेत जाऊन योग्य ते निर्णय घेता आले पाहिजेत, तरच आपण खऱ्या अर्थाने आपल्या तसेच इतरांच्या ही जीवनाचे योग्य ‘व्यवस्थापक’ होऊ शकतो.

अर्थातच याकरिता आपल्याला प्रत्येक गोष्टीतील सत्य जाणून घेणे गरजेचे आहे. आता जगाच्या या जत्रेत श्रीकृष्णासारखे खेळणे मिळाल्यानंतर श्रद्धा, भक्ती आणि समर्पणाच्या बळावर कलयुगातील भवसागर पार करण्याची तसेच हलाहल पचवण्याची शक्ती मिरेमध्ये निर्माण झाली ती याच निर्गुणाच्या चरणी पूर्णपणे स्वतःला अर्पण केल्याने. हे सत्य जर आपण जाणून घेतले, तर आणि फक्त तरच कॅकटस वर पडलेल्या दोन पावसाच्या थेंबात ओयासीस न शोधता गतीमान ब्रम्हांडाला ज्या शक्तीमुळे चालना मिळते त्याच्या दुःखविभोर प्रतिमांची यथायोग्य मांडणी करून आपण आपल्या आयुष्याच्या कॅलिडोस्कोपवर सुखाचे इंद्रधनूचे सप्तरंग उतरवू शकू. मला मान्य आहे की, आपल्या आलेल्या अनुभवांच्या ओंजळीत क्रौर्याचे, अवमानाचे, दुःखाचे असंख्य क्षण आहेतच. पण म्हणून अधमांच्या या वसाहतीत सांज सावळ्या अलवार क्षणी अद्वैताच्या उंबरठ्यावर कुस बदलणाऱ्या सत्यशील ऋतूचक्रातील माणूसकीच्या वाटेवर समृद्ध तसेच उदात्त चारित्र्यसंपन्न असे सौंदर्यपूर्ण असे शुभंकर गोंदण गाव आहेच. त्यामुळे वाईटातून ही चांगले शोधण्याचा प्रयत्न करा. वासनेने बरबटलेल्या स्री लंपट रावणाचे दहन करण्यापूर्वी त्याच्यातील ‘शिवभक्ती’ घ्या, कर्णाकडून फक्त दानशूरपणाच नव्हे, तर मित्र प्रेमाचा वसा घ्या. लक्षात ठेवा देवाने चराचरात जीवसृष्टी निर्माण केली ती सारखीच केली होती त्यात कुठलाही भेदभाव त्या विधात्याने केलेला नाही. पण त्या परमात्म्याकडून घेताना प्रत्येक प्राणीमात्रांनी जे-जे घेतले तसेच त्या-त्या प्राणीमात्रांच्या कर्मांच्या पोतडीनुसारच ही जीवसृष्टी उभी राहिली आहे. कुणी अमृत घेतले, तर कुणी सुरा. त्यामुळे आपापल्या कर्मांनुसार आपापल्या व्यक्तिमत्वाची जडणघडण झाली. तसेच पुढे जाऊन पुन्हा एकदा सुख-दुःखाची आपापली परडी भरली गेली. तसे बघायला गेले, तर अंगावर कितीही राजवस्त्र घातली किंवा कितीही रत्नजडित अलंकार धारण केले तरीही वैचारिक दारिद्र्य आणि प्रक्षोभक समाज विघातक विचार हे लपत नाहीत, हेच‌ त्रिवार सत्य आहे. म्हणूनच मनासारखी समाजप्रबोधक रचना घडेपर्यंत, कुविचारांची जळमटे झटकून विशुद्ध विचारांनी शास्त्रसंमत प्रगत सुसंबद्ध विचारांची बकुळ फुले फुलवत राहा. कारण टाटा बिर्ला, अंबानी कुणीही असो प्रत्येकाच्या आयुष्यात ‘सुख जवा एवढे आणि दुःख हे नेहमीच पर्वता इतकेच असते’ आणि ते ज्याचे त्यालाच माहिती असते. म्हणूनच ग्लास नेहमीच अर्धा ‘भरलेला’ आहे की अर्धा ‘रिकामा’ आहे हे आपण कसे घेतो त्यावर अवलंबून असते.

कसे आहे ना की, यशाची उत्तुंग शिखरे गाठल्यावर नव्हे, तर नेहमीच चंदनास्वरूप झिजण्यात असलेले सुख हे फक्त ज्याचे त्यानेच अनुभवायचे असते. म्हणूनच पर्वताच्या पायथ्याशी उभे राहून उंचावरून दिसणाऱ्या विहंगम दृष्यांची ‘दिवा स्वप्न’ पाहण्यापेक्षा संपूर्ण श्रद्धेची आणि अपार कष्टांची दक्षिणा आपल्या आयुष्यरूपी ईश्वराच्या पायांशी समर्पित करा मग पहा… अपेक्षा आणि स्वप्ने यांच्या भोवऱ्यात अडकलेल्या आपल्या पंचतत्वाच्या विणीतून तयार झालेल्या आपल्या आत्म्याचे प्रतिबिंब किती देखणे होईल ते आणि देह गोंदणाच्या या आकर्षणाचे हे गोंदण गीत कुठेतरी निर्मळपणे सुस्वर भैरवीत रूपांतरीत होता होता, त्या परमपित्याच्या चरणी लीन होऊन जन्म मृत्यूच्या या फेऱ्यातून मुक्त होईल.
आणि अखेरीस अगदी माझ्याच शब्दांत सांगायचे झाले तर,

“ गोऱ्या कातडीचा दरारा…
साऊल गोंदणी हुंदका…
विषयासक्तीची कर्मफले…
मुक्ती मागते आकांतविभोर…
मुक्ती मागते आकांतविभोर…’’

Recent Posts

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

20 minutes ago

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

48 minutes ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

1 hour ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

2 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

2 hours ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

2 hours ago