Pandhari : हरी नामाच्या गजराने पंढरी दुमदुमली

Share

पाच लाख भाविकांच्या साक्षीने कार्तिकी एकादशी सोहळा उत्साहात

पंढरपूर : भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची… उभी पंढरी (Pandhari) आज नादावली… तुझे रूप ओठी तुझे रूप ध्यानी…जीवाला तुझी आस का लागली! विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरीत दाखल झालेल्या सुमारे पाच लाख भाविकांच्या हरी नामाच्या गजराने पंढरी नगरी दुमदुमून गेली होती. कार्तिकी एकादशीला चंद्रभागा नदीमध्ये पवित्र स्नान केल्यानंतर भाविकांना पांडुरंगाच्या दर्शनाची आस लागली होती. मंगळवारी (ता. १२) श्री विठ्ठल दर्शनाची रांग दहा नंबर पत्रा शेडच्या पुढे गेली होती. तर श्रींच्या दर्शनासाठी १६ ते १८ तासांचा अवधी लागत होता.

कार्तिकी एकादशीला चंद्रभागा नदीत स्नान करण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांनी अलोट गर्दी केली होती. नदीत स्नानाची पर्वणी साधल्यानंतर बहुतांश भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पत्रा शेड दर्शन उभे होते तर दिंडीतील वारकरी नगरप्रदक्षिणेला निघाले होते. कपाळी अष्टगंध, बुक्का याचा टिळा, मुखी पुंडलिक वरद हा घोष, खांद्यावर भागवत धर्माची भगवी पताका व हाती टाळ मृदुंग हा परिवेश धारण करून नगर प्रदक्षिणेला निघालेल्या दिंडीतील भाविकांच्या जयघोषाने पंढरीतील वातावरण भक्तीमय झाले होते. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग व चंद्रभागा नदीचे वाळवंट भाविकांच्या अथांग गर्दीने फुलून गेला होता.

श्री विठ्ठल मंदिर सभोवतालच्या परिसरामध्ये होणाऱ्या भाविकांच्या अलोट गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने यंदा प्रथमच बेरीकेडिंग करण्यात आले होते. श्री संत नामदेव पायरी व पश्चिम द्वार परिसरामध्ये इंग्रजी व्ही आकाराचे बेरीकीडिंग केल्यामुळे गर्दीचे विभाजन झाल्याचे दिसून आले. त्यामुळे भाविकांना श्री विठ्ठल मंदिराच्या कळसाचे दर्शन व मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करणे सुलभ झाले होते.

कार्तिकी यात्रा सोहळ्यानिमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांच्या सजावटीनं सजविण्यात आले होतं. ‘विठ्ठल आमचे जीवन’ या थीमवर आधारित मंदिराला केलेली सजावट व फुलांच्या सजावटीमध्ये तयार केलेली श्री विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा पाहून भाविक आनंदीत झालेले दिसून आले. पुणे येथील भक्त राम जांभूळकर यांनी विठुरायाच्या गाभाऱ्याला आकर्षक फुलांची सजावट केली होती. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या कालावधी दरम्यानच कार्तिकी एकादशीचा सोहळा आला आहे. सध्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे राज्यभरातील गावोगावचे बहुतांश भाविक आपापल्या नेत्यांच्या प्रचारात गुंतले आहेत. त्याचा परिणाम कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरला येणाऱ्या भाविकांच्या गर्दीवर देखील झाला आहे. दरवर्षीपेक्षा यंदा भाविकांच्या संख्येत २५ ते ३० टक्के घट झाली आहे असे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात आले. भाविकांच्या संख्येत घट झाल्याने पंढरीतील (Pandhari) प्रासादिक साहित्य विक्री व्यावसायिकांसह हॉटेल, लॉजेस यांच्या आर्थिक उलाढालीवरही परिणाम झाला आहे.

Tags: Pandhari

Recent Posts

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

3 hours ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

3 hours ago

रोहित शर्मा:रॅग्ज टु रिचेस कहाणी

उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…

3 hours ago

India Pakistan War News : पाकड्यांना भारताचे जोरदार प्रत्युत्तर! कराची बेचिराख!

सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…

3 hours ago

रेस्टॉरंटमधील सर्व्हिस चार्ज: एक अनुचित वसुली

मधुसूदन  जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…

4 hours ago

India-Pakistan war: भारताच्या कारवाईला अमेरिकेचे समर्थन, पाकिस्तानला फटकारले

नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…

5 hours ago