सिंधुदुर्ग : राज्यभरात सुरु असलेल्या विधानसभा निवडणूक (Assembly Election 2024) रणसंग्रामासाठी सर्व राजकीय पक्षांची जय्यत तयारी सुरु आहे. अशातच आज कुडाळमध्ये निलेश राणे (Nilesh Rane) यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी भाजपा केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे उपस्थित असून त्यांनी विरोधकांवर चांगलाच निशाणा साधला आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उबाठा गटाचे २५ पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाही, असा दावा नारायण राणे यांनी केला. कारण उद्धव ठाकरे यांची भाषा सुसंस्कृत नाही, ते शिव्या देतात. ही भाषा बाळासाहेब ठाकरे यांच्या घराण्याला शोभत नाही. उद्धव ठाकरे यांची भाषा संस्कृत नसून बाळासाहेबांच्या घराण्याच्याला अशी भाषा शोभत नाही. आज बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) असते तर त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना गोळ्या घातल्या असत्या, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केली.
उद्धव ठाकरे हे हिंदुत्त्व पणाला लावून मुख्यमंत्री झाले. त्यावेळी अडीच वर्षात केवळ दोन दिवस मंत्रालयात काम केले आणि आता पुन्हा मला मुख्यमंत्री करा, असे म्हणतात. अशा लोकांना सत्ता कोण देईल? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
शरद पवार (Sharad Pawar) याचे वय ८३-८४ इतके आहे. तरीदेखील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकास पाहून त्यांना असह्य झाल्याने त्यांनी राणेंच्या दोन्ही मुलांवर संस्कार नाहीत, अशी टीका केली. मात्र माझ्या घरात त्यांच्यावर संस्कार झाले. मी देखील पवारांची कुंडली काढलेली आहे. गेली अनेक वर्षे आम्ही देखील राजकारणात आहोत. पवार साहेब तुम्ही चार वेळा मुख्यमंत्री होता. विकासावर आणि मराठा आरक्षणावर बोलू नका, असा घणाघात नारायण राणे यांनी शरद पवार यांच्यावर केला.
दरम्यान, २३ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकालात निलेश राणे हे आमदार होतील असेच जाहीर होणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…