मुंबई: पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना रावळपिंडी येथे खेळवला जात आहे. या सामन्यादरम्यान एक घटना घडली. पाकिस्तानने पहिल्या डावात ऑलआऊट होईपर्यंत ३४४ धावा केल्या. या दरम्यान साजिद खानने ४८ धावांची खेळी केली. साजिद खेळताना खूप दुखापतग्रस्त झाला. मात्र तरीही त्याने मैदान सोडले नाही. साजिदला जखम झाली होती. त्यामुळे रक्तही येऊ लागले होते.
साजिद पाकिस्तानसाठी १०व्या स्थानावर बॅटिंग करण्यासाठी आला होता. या दरम्यान ९२व्या षटकातील चौथ्या बॉलवर तो दुखापतग्रस्त झाला. इंग्लंडकडून रेहान अहमद ओव्हर करत होता. त्याचा बॉल साजिदच्या हेल्मेटमधून आत जात हाडांवर लागला. यामुळे रक्त वाहत होते. दरम्यान ते मैदान सोडून आले नाही. साजिदची ही स्थिती पाहून फिजिओ मैदानावर आले. त्यांना प्राथमिक उपचार दिले. साजिदने जर्सी बदलली आणि पुन्हा खेळायला लागला.
साजिदने पाकिस्तानसाठी रावळपिंडी कसोटीत शानदार कामगिरी केली. त्याने इंग्लंडच्या पहिल्या डावात ६ विकेट मिळवल्या. साजिदने २९.२ षटकांत १२८ धावा केल्या. साजिदने यानंतर बॅटिंगमध्येही कमाल केली. त्याने ४८ चेंडूंचा सामना करताना ४८ धावा केल्या. सजितने २ चौकार आणि ४ षटकार लगावले. पाकिस्तानने पहिल्या डावात ३४४ धावा केल्या. इंग्लंडने दुसऱ्या डावात ३ विकेट गमावत २४ धावा केल्या. या दरम्यान साजिदने १ विकेट घेतली.
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…