भुवनेश्वर : बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र खोल दाबात रूपांतरित झाले असल्यामुळे आज त्याचे ‘दाना’ या चक्रीवादळात (Dana Cyclone) रूपांतर होणार असल्याची बातमी समोर आली आहे. येत्या ४८ तासात ओडिशाच्या किनारपट्टीवर हे वादळ धडकणार असल्यामुळे किनारपट्टी लगतच्या सर्व भागात हवामान विभागाने अलर्ट मोड जारी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २४ आणि २५ ऑक्टोबर दरम्यान दाना चक्रीवादळ भीतरकनिका राष्ट्रीय उद्यान आणि ओडिशातील धामरा बंदरादरम्यान किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यावेळी वाऱ्याचा वेग प्रतितास १००-११० किमी राहील. वाऱ्याचा वेग प्रति तास १२० किमी पर्यंत वाढू शकतो. त्यामुळे ओडिशा सरकारने राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये २६ ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर मच्छिमारांना देखील समुद्रात न जाण्याची सूचना देण्यात आल्या आहेत.
हवामान विभागाने ओडिशा, गंगेच्या पश्चिम बंगालमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…
देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…
मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…