मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांकरता भाजपाचा वचननामा जनतेच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब असेल, असे प्रतिपादन सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी येथे केले. भाजपाच्या वचननामा समितीच्या प्रदीर्घ बैठकीनंतर ते बोलत होते.
भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला वचननामा समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात प्रामुख्याने डॉ. विनय सहस्रबुद्धे, मंगलप्रभात लोढा, दिलीप कांबळे, मधु चव्हाण, ॲड.उज्ज्वल निकम, पाशा पटेल, राजेश पांडे, डॉ.भारती पवार, नीता केळकर, माधवी नाईक, सुरेश हावरे, लद्धाराम नागवानी, लक्ष्मण सावजी, स्मिता वाघ, अमोल जाधव, अनिल सोले, दयानंद तिवारी, कर्ण पातुरकर,मिलिंद तुळसकर आदी प्रमुख नेते सहभागी होते.
या बैठकीत उपस्थित नेत्यांनी वचननाम्यात समाविष्ट करण्याच्या विविध बाबींवर सविस्तर चर्चा केली. आजवर मतदारांकडून व विविध विषयातील तज्ञांकडून प्राप्त झालेल्या सूचनांवरही सांगोपांग चर्चा झाली. भाजपाचा हा वचननामा सामाजिक जीवनाच्या सर्वच अंगांना स्पर्श करणारा, सर्व घटकांचे समाधान करणारा असा सर्वसमावेशक असावा यासाठी वचननामा समिती प्रयत्नशील आहे असेहीसुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
लोकनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रणित महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रवाहात सहभागी होण्याची प्रत्येक नागरिकाला ही संधी असून नागरिकांकजून या वचननाम्यासाठी येणाऱ्या प्रत्येक सूचनेचे आम्ही स्वागत करीत आहोत, असेहीसुधीर मुनगंटीवार म्हणाले. आपल्या सूचना आपण visionformaharashtra@gmail.com या ईमेल वर किंवा पत्राद्वारे अथवा ९००४६१७१५७ या व्हॉट्सअप वर लवकरात लवकर पाठवाव्यात अशी विनंती त्यांनी पुन्हा एकदा राज्याच्या नागरिकांना केली आहे. तर भाजपा प्रदेश कार्यालयातही वचननाम्यासंदर्भात नागरिकांच्या सुचना स्वीकारण्याकरता एक पेटी ठेवण्यात आली आहे.
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…