सोलापूर : नवरात्रोत्सवाला (Navratrotsav) सुरुवात झाली असून सर्वत्र आनंददायी वातावरण निर्माण झाले आहे. मात्र अशातच नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी गालबोट लागल्याची घटना घडली आहे. तुळजापूरहून देवीची ज्योत घेऊन येत असताना भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूरहुन मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडीकडे जाताना कामती येथे ही घटना घडली. नवरात्रोत्सवासाठी देवीची ज्योत नेताना भाविकांनी भरलेले पिकअप व्हॅन स्त्याच्या कडेला असणाऱ्या एका खड्ड्यात पलटी झाले. व्हॅन थेट अंगावर कोसळल्यामुळे या दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने जखमींना उपचारासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र ऐन सणासुदीच्या काळात दुर्दैवी घटना घडल्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत असताना दु:खाचे वातावरण पसरले आहे.
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…