मुंबई: भारतीय संघाने आपल्या घरात बांग्लादेश संघाला हरवले. त्यांनी २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० असे चीत केले.
आता भारतीय संघ आणि बांग्लादेश यांच्यात ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. यातील पहिला सामना ६ ऑक्टोबरला ग्वालियारमध्ये खेळवला जाईल.
कसोटी मालिकेत रोहित शर्मा कर्णधार होता. मात्र आता टी-२० मालिकेत सूर्यकुमार यादव नेतृत्व करणार आहे. मालिकेआधी सूर्या नव्या लूकमध्ये दिसत आहे. सूर्याने अलीम हकीमकडून नवी हेअरस्टाईल केली आहे. या दोघांनी सोशल मीडियावर अनेक फोटोज शेअर केले आहेत.
View this post on Instagram
सूर्याचा नवा लूक चाहत्यांना अतिशय आवडत आहे. एका युजरने कमेंट करताना लिहिले, चिकना सूर्या, अन्य युजरने लिहिले, दाढीही वाढव.
स्टार फलंदाज सूर्यकुमारला कसोटी संघात स्थान मिळाले नव्हते. मात्र तो टी-२० फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा नियमित कर्णधार आहे.