मुंबई: आंध्र प्रदेशातील अनकापल्ले येथील फार्मा कंपनीत बुधवारी जोरदार स्फोट झाला. यात १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर कमीत कमी ४१ जण जखमी झाले आहेत. घटनेनंतर लगेचच जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिडिया रिपोर्ट्सनुसार अच्युतरपुरम एसईजेड स्थित एका कंपनीत रिअॅक्टरचा स्फोट झाला. डॉक्टरांच्या टीम जखमींवर उपचार करत आहेत. जखमींचे नातेवाईकही रुग्णालयात पोहोचले आहेत. अशात सांगितले गेले की या सर्व घटनेनंतर या कुटुंबियांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
कंपनीत ही दुर्घटना दुपारच्या वेळेस घडली नाहीतर खूप मोठी जिवितहानी झाली असते. कारण दुपारच्या वेळेस जेवणासाठी अनेक कामगार बाहेर गेले होते. त्यावेळेस रिअॅक्टरजवळ कमी कर्मचारी होते.
पंतप्रधानकार्यालयाकडून एक्स पोस्टमध्ये मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रूपये मदतीची घोषणा करण्यात आली आहे. पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले, अनकापल्लीमध्ये झालेल्या फॅक्टरीमध्ये झालेल्या दुर्घटनेतील मृत्यूप्रकरणी दु:खी आहे. आपल्या प्रिय व्यक्ती गमावलेल्यांप्रती संवेदना. जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना करतो.
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…