मुंबई: श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या हॉरर-कॉमेडी सिनेमा ‘स्त्री २’ची क्रेझ प्रेक्षकांवर जोरदार आहे. ५ दिवसांपासून हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. ‘स्त्री २’ने बॉक्स ऑफिसवर असे काही वादळ आणले की अक्षय कुमार आणि तापसी पन्नू यांचा सिनेमा ‘खेल खेल में’ आणि जॉन अब्राहमचा सिनेमा ‘वेदा’ बॉक्स ऑफिसवर टिकूच शकला नाही. ५ दिवसांच्या धमकेदार कमाईने ‘स्त्री २’ने किती कोटी छापले आहेत घ्या जाणून..
‘स्त्री २’ने बॉक्स ऑफिसवर केवळ ५ दिवसांतच २०० कोटींचा बिझनेस केला आहे. सोमवारी या सिनेमाने पहिला मंडे टेस्ट होता आणि ‘स्त्री २’ने मंडे टेस्टमध्ये चांगली कामगिरी केली. रिपोर्टनुसार सोमवारी ‘स्त्री २’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ३७ कोटी रूपयांची कमाई केली.
५१.८ कोटी रूपयांच्या कलेक्शनसह धमाकेदार सुरूवातीनंतर ‘स्त्री २’ने वीकेंडमध्येही जोरदार कमाई केली आहे. सोमवारच्या कलेक्शननंतर २०० कोटींचा बेंचमार्क या सिनेमाने क्रॉस केला आहे. Sacnilk च्या रिपोर्टनुसार ‘स्त्री २’ने बॉक्स ऑफिसवर २२८.४५ कोटी रूपयांचा बिझनेस केला आहे.
राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर स्टार ‘स्त्री २’ने या वर्षी वेगवान १०० कोटी कमावले. यात कल्कि एडीने वेगवान १०० कोटी जमवले होते.
अक्षय कुमार, तापसी पन्नू, फरदीन खान, वाणी कपूर यांचा सिनेमा खेल खेल मेंने ५ दिवसांत बॉक्स ऑफिसवर केवळ १५.९५ कोटींचा बिझनेस केला तर या सिनेमाची सुरूवात ५ कोटीच्या कलेक्शनने झाली.
मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…