Weekly horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, १८ ते २४ ऑगस्ट २०२४

Share

साप्ताहिक राशिभविष्य, १८ ते २४ ऑगस्ट २०२४

शुभग्रहांची साथ

मेष : या आठवड्यात शुभग्रहांची साथ मिळाल्यामुळे विशेषतः विद्यार्थ्यांना अनुकूल फळे प्रतिपादित होतील. उच्च शिक्षणाचे मार्ग प्रशस्त होतील. शिष्यवृत्तीसह परदेशगमनाचे योग आहेत. मात्र प्रामाणिक प्रयत्नांची आवश्यकता राहील. कुटुंबातून तसेच गुरुतुल्य व्यक्तींकडून मार्गदर्शन व मदत मिळेल. नोकरीमध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होऊन प्रशंसेस पात्र ठराल. एखादी महत्त्वाची जबाबदारी पार पाडावी लागेल. वरिष्ठांशी चांगले संबंध प्रस्थापित होतील. व्यवसाय धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहील. स्पर्धकांवर मात करता येईल. कुटुंबातील तरुण-तरुणींचे भाग्योदय होतील. मंगल कार्य ठरेल. परदेशी संधान यशस्वी होईल.

मोठे आर्थिक लाभ

वृषभ : अनेकानेक मार्गांनी धन आगमन होईल. गुंतवणूक भरघोस आर्थिक फायदा मिळवून देतील. नवीन गुंतवणूक करण्याची इच्छा होईल मात्र नवीन गुंतवणूक करताना जाहिरातींना तसेच इतरांच्या गोड बोलण्याला फसू नका. त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींच्या सल्ला अवश्य घ्या. जमीन-जुमला, मालमत्तेचे व्यवहार इत्यादींमधून मोठे आर्थिक लाभ होतील. ओळखी, मध्यस्ती फलद्रूप होतील. एखादे रखडलेले महत्त्वाचे काम तसेच सरकारी कामसुद्धा सफल होईल. मोठ्या राजकीय व्यक्तींच्या ओळखीतून लाभ होतील. प्रवाही ग्रहमान असल्यामुळे वेगाने घटना घडतील. विवाहसारख्या समारंभांना उपस्थित राहाल. व्यावसायिक जुने संबंध नव्याने प्रस्थापित होऊ शकतात.

शुभ फळे मिळतील

मिथुन : नोकरीधंद्यात शुभ फळे मिळतील. मनासारख्या घटना होतील. नोकरीतील राजकारण संपेल. वरिष्ठांची मर्जी राहील. तसेच हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. व्यवसाय-धंद्यात नवीन करार-मदार होऊन काही फायद्याचे सौदे हाती येतील. व्यवसायात केलेले बदल सकारात्मक ठरतील. कोणत्याही प्रकारच्या खरेदी-विक्रीमध्ये सावधानता बाळगणे गरजेचे आहे. कोणत्याही प्रकारचे लहान-मोठे आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहावे. वादग्रस्त येणे वसूल होईल. शांतपणे निर्णय घेणे आवश्यक ठरेल. कुटुंबात जोडीदाराचे सहकार्य चांगले मिळेल. वैवाहिक सुख लाभेल.

समस्या संपुष्टात येतील

कर्क : कुटुंबातील मुला-मुलींच्या प्रगतीच्या वार्ता कानी येतील. त्यांचे नोकरीविषयक असलेले प्रश्न अथवा समस्या संपुष्टात येतील. कॉलेज कॅम्पसमधून नोकरी नक्की होईल. परदेशी जाण्याचे स्वप्न साकार होईल पण त्या दृष्टिकोनातून प्रयत्न आवश्यक. प्रामाणिक प्रयत्नांची गरज राहील. अचानक खर्च करावा लागेल; परंतु मदत उपलब्ध होईल. कुटुंबात तसेच आपल्या कार्यक्षेत्रात वाद-विवाद टाळणे हितकारक ठरेल. रागावर नियंत्रण हवे. प्रवासाचे योग आहेत पण प्रवासामध्ये जपून राहावे, वाहनाच्या वेगावर नियंत्रण आवश्यक आहे. दुसऱ्या वाहनांबरोबर स्पर्धा नको.

नवीन करार-मदार

सिंह : काही महत्त्वाची कामे रखडलेली होती व ती पूर्ण करण्यासाठी आपण मनापासून प्रयत्न करीत होता अशा स्वरूपाची कामे या कालावधीत हातावेगळी करता येतील. या कामात आपल्याला मदत मिळेल. व्यवसाय धंद्यात काही नवीन घटना घडतील. त्या व्यवसायात पोषकच ठरतील. व्यवसायाचे स्वरूप बदलू शकते. त्याचप्रमाणे व्यवसाय विस्ताराचा विचार करू शकाल. मित्रमंडळींच्या वर्तुळातून सहाय्य मिळेल. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. विशेषतः ज्यांचे परदेशी व्यापार आहेत अशांचे काही नवीन करार-मदार होऊ शकतात.

उत्साह व आत्मविश्वास वाढेल

कन्या : दीर्घकालीन रखडलेली कामे पूर्ण होतील; परंतु प्रयत्नात कमी पडू देऊ नका. आळस झटका. स्वतःचे काम स्वतः करा. इतरांवर कोणतेही काम सोपवू नका. शुभ ग्रहमानाचा फायदा करून घ्या. व्यवसाय धंद्यात उलाढाल वाढेल. आपल्या उत्पादनाला सतत मागणी राहील. त्यामुळे उत्साह व आत्मविश्वास वाढेल. कुटुंबातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील. योग्य जीवनसाथी निवडता येईल. आर्थिक चिंता मिटतील. सहकुटुंब, सहपरिवार सहलीचा आनंद लुटाल.

ऊर्जा संपन्न राहाल

तूळ : सध्याचे प्राप्त ग्रहमान आपल्यासाठी पूर्णपणे अनुकूल राहील. हात लावाल तेथे सोने होईल. सर्वच बाबतीत यशदायक परिस्थिती निर्माण झालेली अनुभवता येईल. विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळू शकते. स्पर्धा परीक्षा उत्तम राहतील. तसेच नोकरीविषयक दिलेल्या मुलाखतीतून यश प्राप्त होईल. उत्साह, आत्मविश्वास ऊर्जा संपन्न राहाल. मात्र इतरांवर टीकाटिप्पणी करताना सावध राहणे जरुरीचे. अतिआत्मविश्वास टाळा. काही वेळेस कुटुंबात तसेच आपल्या कार्यक्षेत्रात लहान-सहान कारणांवरून वादविवादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे वादविवाद टाळणे हिताचे ठरेल.

व्यवसाय विस्तार

वृश्चिक : व्यवसाय-धंद्यात अथवा नोकरीत वातावरण अनुकूलतेने भरलेले राहील. आतापर्यंत नोकरीत अथवा आपल्या कार्यक्षेत्रात आलेला ताणतणाव संपुष्टात येईल. काही व्यवसायासाठी असलेले सकारात्मक बदल व्यवसायास पोषक ठरतील. भागीदारी व्यवसायात व्यवसाय विस्ताराचे नियोजन करता येईल. नवीन उत्पादनाविषयी सकारात्मक हालचाली होतील. तसेच व्यावसायिक जागेचे नियोजन करता येईल. नोकरीमध्ये राजकारण आणि गटबाजी संपून आपण केलेल्या कार्याचा गौरव होईल.

प्रयत्न सफल होतील

धनु : शुभग्रहांच्या शुभ योगाचा वरचष्मा या सप्ताहात राहील. स्वतंत्र व्यवसायिक आपल्या व्यवसाय-धंद्यात चांगले यश मिळवू शकतील. ज्यांचा व्यवसाय प्रदेशाची संबंधित आहे विशेषतः अशा व्यवसायात आर्थिक फायदे मिळतील. परदेशवारीची पण शक्यता राहील. काही दीर्घकालीन फायद्याचे सौदे हाती येतील. पूर्वी केलेले व्यावसायिक नियोजन सफल होताना दिसेल. त्यामुळे केलेले बदल व्यवसायास पोषक ठरतील. व्यावसायिक उलाढाल वाढेल. नफ्याच्या प्रमाणात चांगली वाढ झालेली जाणवेल.

वाद-विवाद संपतील

मकर : गेल्या काही दिवसांत आपल्याला कोणत्या तरी गोष्टीतून त्रास अथवा मनस्ताप होत होता, अशा समस्या सुटतील. तोडगा हाती येईल. राहत्या घराविषयीचे प्रश्न सुटून स्वतःच्या घरात राहता येईल. वाद-विवाद संपतील. वडिलोपार्जित संपत्तीविषयी असलेले मतभेद संपुष्टात येतील. सर्वमान्य तोडगा निघेल. आप्तेष्ट, भावंड यांच्याबरोबर असलेले मतभेद अथवा वाद-विवाद संपून नाती सुधारतील. पूर्वी दिलेल्या नोकरीविषयक मुलाखतीतून नोकरीचे बोलावणे येऊ शकते. चालू नोकरीमधील परिस्थिती तीच राहिली तरी नव्या नोकरीविषयीचे विचार डोक्यात येऊ शकतात. व्यवसाय-धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहील.

वैयक्तिक उत्सव समारंभ

कुंभ : आतापर्यंत आलेली मरगळ दूर होऊन उत्साह वाटेल. आत्मविश्वासात वृद्धी होईल. आपल्या समोरील कामे आपण वेगाने कराल. नवीन कामे हातात घ्याल. बदलत्या ग्रहमानानुसार, बदलत्या परिस्थितीचा फायदा मिळेल. महत्त्वाची कामे हातावेगळी करून घ्या. त्यामध्ये टंगळमंगळ करू नका. इतरांवर कामाच्या बाबतीत अवलंबून राहणे चुकीचे ठरेल. महत्त्वाच्या बाबीत यशाचे प्रमाण वाढते राहील. मात्र योग्य वेळेस योग्य निर्णय शांतपणे घ्या. स्वतःच्या मताला किंवा आपल्या आवाजाचे ऐका. व्यवसायात नवीन योजना सफल होईल. वैयक्तिक उत्सव समारंभ होतील. हातात घेतलेले प्रत्येक काम यशस्वी होईल.

विवाह ठरतील

मीन : कुटुंबातील तरुण-तरुणींची समस्या अथवा प्रश्न सुटतील. तसेच विवाहोत्सुक मुला-मुलींचे विवाह ठरतील. काहींचे परिचयोत्तर विवाह ठरू शकतात. आतापर्यंतचे प्रेमप्रकरण विवाहासारख्या पवित्र बंधनात बांधले जाईल. मनासारखा जीवनसाथी मिळू शकतो. नोकरीविषयक समस्या संपुष्टात येऊन नोकरी मिळेल. नोकरीसाठी दिलेल्या मुलाखती यशस्वी ठरतील. ओळखी मध्यस्तीमुळे महत्त्वाची कामे पार पाडता येतील. व्यवसाय-धंद्यात परिस्थिती सुधारत जाईल. केलेले नियोजन सफल होताना दिसेल. बहुतांश गोष्टीत सफलता हाती येईल. व्यवसायाची आर्थिक घडी व्यवस्थित बसेल.

Recent Posts

मुंबईच्या विमानतळाजवळ अज्ञात ड्रोनच्या घिरट्या, उडाली खळबळ!

मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…

2 hours ago

India Pakistan War : पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताचं सडेतोड उत्तर!

पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…

2 hours ago

भारताकडे तेल, गॅसचा पुरेसा साठा

नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…

2 hours ago

IPL 2025 स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित

नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…

2 hours ago

मुंबईत मध्य रेल्वेच्या ट्रान्स-हार्बर मार्गावर प्रवाशांची गैरसोय, स्टेशनवर कामाला जाणाऱ्यांची गर्दी

मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली.  ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…

2 hours ago

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

4 hours ago