मुंबई : मातोश्री बाहेर आलेले मुसलमान शिंदेची माणसं होती, अशी वल्गना करणा-या संजय राऊतसह उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सडकून टीका केली.
पत्रकार परिषदेत बोलताना नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले की, जो बाळासाहेबांचा झाला नाही तो त्या मुस्लिमांचा काय होणार. ज्यांच्या मतांवर त्यांचे नऊ खासदार निवडून आले त्यांनी वक्फ बोर्डाच्या वेळी संसदेतून पळ का काढला याचे मुसलमान समाजाला संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी मशिदीमध्ये जाऊन उत्तर द्यावे. राजारामचे रक्त असेल तर समोर जा, घाबरतो कशाला? असे जाहीर आव्हान नितेश राणे यांनी दिले आहे.
संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे खुर्चीसाठी लाचार झालेत. ते मतांसाठी मुस्लिमांच्या दाढ्या कुरवाळत आहेत. आणि जेव्हा त्यांच्यासाठी काही करायची वेळ येते तेव्हा हे पळ काढतात. मनसे कार्यकर्ते यांना योग्य बोलले ‘हिजडा’. पण ‘ते’ सुद्धा स्वाभिमानी आहेत. लाचारी करत नाही, असा उपरोधिक टोलाही नितेश राणे यांनी लगावला.
संजय राऊत म्हणाले की, दोन महिन्यानंतर अॅक्शन होणार आहे. त्यावर बोलताना नितेश राणे यांनी सांगितले की, हो नक्कीच ह्यांच्यावर अॅक्शन होणार आहे आणि त्यांची रिअॅक्शन करेपर्यंत हे जेलमध्ये असतील. तू आणि तुझा आदित्य रेंज मध्ये आहे. स्वतःचा पहिला जीव वाचव, मग अॅक्शनी भाषा कर, असा चिमटाही नितेश राणे यांनी काढला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपारी टाकणारे कार्यकर्ते हे मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावरून आलेले होते. वसुली गँग मातोश्रीवर बसली आहे. वसुलीचा बादशाह मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर बसला आहे. आम्हाला पण तमाशाच्या शोची तिकीट पाहिजे. राऊत तमाशा वालाच आहे. हा नाच्या पहिला सिल्वर ओक वर होता. आता तो दिल्लीत नाचतोय, असा हल्लाबोल करत नितेश राणे यांनी अक्षरश: दोघांचेही वाभाडे काढले.
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…