Anita Birje : ठाण्यात मेळावा संपताच ठाकरेंच्या वाघिणीचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश!

Share

ऐन विधानसभेच्या तोंडावर ठाकरेंना मोठा धक्का

ठाणे : लोकसभेत अधिक जागा मिळूनही ठाकरे गटाचा प्रभाव वाढला नसल्याचेच चित्र आहे. आता सर्वच राजकीय पक्ष विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर काल ठाकरे गटानेही ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे मेळावा आयोजित केला होता. मात्र, मेळावा संपताच उद्धव ठाकरेंना एक मोठा धक्का बसला. शिवसेनेत फूट पडल्यानंतरही ठाकरेंसोबत राहिलेल्या अनिता बिर्जे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची वाट धरली. कालच हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

शिवसेनेच्या जुन्या कार्यकर्त्या, तसेच दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या सहकारी अनिता बिर्जे यांनी ठाकरे गटाची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रात्री हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या पक्षप्रवेश सोहळ्यानंतर एकनाथ शिंदे यांनी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की “अनिता बिर्जे यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली आगामी काळात शिवसेना अधिक जोमाने काम करेल.”

एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की “उबाठा गटाच्या उपनेत्या आणि आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या कट्टर शिवसैनिक अनिता बिर्जे यांनी आज आनंदआश्रमात येऊन शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.”

पुढे त्यांनी म्हटलं आहे की “शिवसेनेच्या जडणघडणीच्या कालखंडात अनिता बिर्जे यांनी तत्कालीन शिवसैनिकांच्या साथीने शिवसेनेची महिला आघाडी तळागाळात पोहोचवली होती. त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच आनंद दिघे यांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसेनेला नवीन बळ मिळाले आहे. त्यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली आगामी काळात शिवसेना अधिक जोमाने काम करेल अशी अपेक्षा याप्रसंगी व्यक्त करतो.”

यावेळी ठाणे जिल्हा महिला संघटका मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेविका सुवर्णा करंजे, माजी नगरसेवक राम रेपाळे, माजी नगरसेवक रमाकांत मढवी, टेंभीनाका शिवसेना शाखेचे शाखाप्रमुख निखिल बुडजडे तसेच ठाणे शिवसेनेतील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Recent Posts

KKR vs CSK, IPL 2025: चेन्नईने केकेआरला हरवले, शेवटच्या षटकात धोनीच्या संघाचा विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज ५७व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने कोलकत्ता नाईट रायडर्सला २…

26 minutes ago

पाक दहशतवाद्यांना धडा शिकविला याचा आम्हाला सार्थ अभिमान : खा.नारायण राणे

कोकणात भारत मातेचा जल्लोष कणकवली : पाकव्याप्त काश्मिरमध्ये भारताने नऊ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करून ते…

2 hours ago

‘ऑपरेशन सिंदूर’मुळे बांगलादेश क्रिकेट संघ चिंतेत

ढाका : भारताने 'ऑपरेशन सिंदूर' द्वारे पाकिस्तानातील ९ दहशतवादी ठिकाणावर हवाई हल्ले केले.यानंतर पाकिस्तानमध्ये भीतीचे…

2 hours ago

मुंबईसह ठाणे, पालघर भागांत हलक्या सरी कोसळल्या

मुंबई : मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून काही भागांत हलक्या सरी कोसळल्या. हवामान विभागाच्या अंदाजानुसार,…

2 hours ago

‘या’ ७ गोष्टी खा, नाहीतर दात पडतील, हाडं तुटतील?

मुंबई : कॅल्शिअम हाडं आणि दातांना मजबूत करण्यासाठी फार गरजेचे असते. आपल्याला दर दिवसाला किमान…

3 hours ago

Gold Rate: सोने चांदी दरात मोठी वाढ

जळगाव : गेल्या आठवड्यात घसरण झालेल्या सोने आणि चांदी दरात आता पुन्हा वाढ होताना दिसत…

3 hours ago