मुंबई: देशात डिजीटल क्रांती आली आहे. लोकांना इंटरनेटची इतकी सवय झाली आहे की त्याच्याशिवाय राहणे अशक्य झाले आहे. इंटरनेट आजच्या काळात महत्त्वाची गरज बनला आहे. दरम्यान, आजही अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे इंटरनेटला जागा नाही. तर आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येक व्यक्ती हाय स्पीड इंटरनेटची मागणी करत आहे.
भारतात इंटरनेटमध्ये गेल्या काही काळापासून खूप बदल झाले आहेत. भारत आता इंटरनेटच्या बाबतीत जगात १२व्या स्थानावर आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे का की भारतात सर्वाधिक वेगवा इंटरनेट स्पीड कुठे मिळतो? जर तुम्ही यासाठी दिल्ली, मुंबईचे नाव घ्या तर तुम्ही चुकीचे आहात.
भारतात इंटरनेट
रिपोर्टनुसार भारत मोबाईल इंटरनेटच्या बाबतीत जगात १२व्या स्थानावर आहे. मोबाईल इंटरनेटच्या स्पीडबाबत बोलायचे झाल्यास भारतात १०७.०३ एमबीपीएसचा स्पीड रेकॉर्ड करण्यात आला आहे. तर ब्रॉडबँड इंटरनेटच्या बाबतीत भारत जगात अद्याप ८५व्या स्थानावर आहे. देशात ब्रॉडबँडचा स्पीड ६३.९९ एमबीपीएस इतका आहे.
येथे मिळतो सर्वाधिक स्पीड
भारतातील चेन्नई शहारत सर्वात वेगवान इंटरनेट स्पीड मिळते. रिपोर्टनुसार येथे इंटरनेट स्पीड ५१.०७ एमबीपीएस इतका रेकॉर्ड करण्यात आला आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानाबाबत बोलायचे झाल्यास बंगळुरू ४२.५० स्पीडसह दुसऱ्या आणि ४१.६८ एमबीपीएस स्पीडसह हैदराबाद तिसऱ्या स्थानावर आहे.