कधी चित… कधी पट…

Share

हलकं-फुलकं – राजश्री वटे

एकाच नाण्याच्या या दोन बाजू…
असंच असतं ना माणसाचं जीवन…
कधी चित … कधी पट!
कभी हार, कभी जीत!!
मानवी जीवनातला ऊन पावसाचा खेळ…
म्हणजे यश आणि अपयश…
काही व्यक्तींच्या आयुष्यात फक्त यशच यश…
यशाचं पारडं कायम भारी!
लहानपणापासून कौतुकाला पात्र एखाद् मूल…
सतत कौतुकात नहात असतं… शाळेपासून अव्वल, कॉलेजमध्ये टॉपर, नोकरीमध्ये उत्तम… सगळ्या सुखसोयींनी युक्त असं आयुष्य…
यश… यश… आणि फक्त यश!!
हळूहळू या यशाची इतकी सवय होऊन जाते की, जरा कमी-जास्त झालं की ते सहन करण्याची ताकद त्यात नसते… यशासाठी अपार मेहनत घेतली असतेच. पण अपयश सहन करण्याची ताकद संपलेली असते…
असं हे खणखणीत नाणं…
पट एके पट!!
या नाण्याला फार जपलं जातं, जे हवं ते मिळतं… सगळं मनासारखं घडत असतं… हळूहळू त्याचा इगो जोपासला जातो… हार मानायचीच नसते… अर्थात जिंकण्याचं स्वप्न बघणं चांगलंच पण हावी व्हायला नको, याचं भान ठेवलं पाहिजे… नाहीतर यश डोक्यात जायला वेळ लागत नाही नाही अन् मग थोड्याशाही मनाविरुद्ध अपयशाने निराशेच्या खोल गर्तेत जाऊन गटांगळ्या खाव्या लागतात… कधी कधी एखादी हार ही पाय जमिनीवर ठेवायला भाग पाडते!!

Recent Posts

India-Pakistan War: राजौरी-पूंछमध्ये LOC वर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये रात्रभर ब्लॅकआऊट

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…

20 minutes ago

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

5 hours ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

5 hours ago

रोहित शर्मा:रॅग्ज टु रिचेस कहाणी

उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…

5 hours ago

India Pakistan War News : पाकड्यांना भारताचे जोरदार प्रत्युत्तर! कराची बेचिराख!

सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…

5 hours ago

रेस्टॉरंटमधील सर्व्हिस चार्ज: एक अनुचित वसुली

मधुसूदन  जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…

6 hours ago