Friday, May 9, 2025
Homeताज्या घडामोडीसमुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी ग्रामपंचायतींना जर्मन बनावटीच्या अत्याधुनिक मशिन्सचे वाटप

समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी ग्रामपंचायतींना जर्मन बनावटीच्या अत्याधुनिक मशिन्सचे वाटप

अलिबाग (प्रतिनिधी) : तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता यांत्रिकी पद्धतीने करण्यात येणार असून, त्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने पुढाकार घेतला आहे. अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छता करण्यासाठी जर्मन बनावटीच्या पामटेक कंपनीच्या तीन अत्याधुनिक बीच क्लिनींग मशिन्स उपलब्ध करून देण्यात आल्या असून, त्याचे वाटप अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्याहस्ते बुधवारी (दि.३१) संबंधित ग्रामपंचायतींना करण्यात आले.

या मशिन्स ट्रक्टरच्या साह्याने समुद्रकिनारी वापरता येणार असून, किनाऱ्यावरील रेती चाळून त्यातील कचरा जमा करण्याचे काम केले जाणार आहे. पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील थोरवे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपजिल्हाधिकारी डॉ. रविंद्र शेळके, पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले, अलिबाग पंचायत समिती गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे यांच्यासह ग्रामपंचायतींचे सरपंच, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात कचरा पडल्याचे नेहमी दिसून येते. शासकीय कार्यालये, सामाजिक संस्था, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम राबवून किनारे स्वच्छ करण्यात येतात. मात्र हे प्रयत्न अपुरे पडत आहेत. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियामक मंडळाने समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला आहे. अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनारी स्वच्छतेसाठी पाम टेक कंपनीची जर्मन बनावटीच्या 3 मशिन्स उपलब्ध करून दिल्या आहेत. बुधवारी या मशिनचे हस्तांतरण पहिले मशिन आक्षी, नागांव, रेवदंडा, दुसरे मशिन वरसोली, थळ, नवेदर – नवगाव, तिसरे मशिन किहीम, आवास, सासवणे या ग्रामपंचायतींना देण्यात आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -