Friday, May 9, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMumbai Rain : मुंबईसह उपनगरात मुसळधार! रेल्वे वाहतूक खोळंबली; प्रवाशांचे हाल

Mumbai Rain : मुंबईसह उपनगरात मुसळधार! रेल्वे वाहतूक खोळंबली; प्रवाशांचे हाल

मुंबई : काल दिवसभर विश्रांती घेतलेल्या पावसाने आज पहाटेपासून चांगलाच (Mumbai Rain) जोर धरला आहे. मुंबईसह उपनगरात पावसाच्या सरी (Heavy Rain) कोसळत असल्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे वाहन चालकांना पाण्यात वाट शोधण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्याचबरोबर मुसळधार पावसाचा फटका मुंबईची लाईफलाइन मानली जाणाऱ्या लोकल (Railway) सेवेवरही पडला आहे. तिन्ही मार्गांवरील लोकल वाहतूक संथ गतीने सुरु असल्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसह इतर प्रवाशांचे देखील हाल होताना दिसून येत आहेत.

तिन्ही रेल्वे मार्गावर परिणाम

मुंबईतील मुसळधार पावसाचा परिणाम तिन्ही मार्गांवरील लोकल वाहतुकीवरही झाला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक २० ते २५ मिनिटे उशिराने, पश्चिम रेल्वेवरील लोकल गाड्या ५ ते १० मिनिटे विलंबाने, तर हार्बर रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहे.

मुंबईला यलो अलर्ट

मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस सुरु असून पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, वसई, विरार यासोबत दादर, माटुंगा, सायन, कुर्ला, वांद्रे, गोरेगाव, बोरीवली येथे पावसाची संततधार कोसळत असल्यामुळे सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे हवामान विभागाने मुंबईला आज यलो अलर्ट दिला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -