नाशिक : नवरचना विद्यालय प्राथमिक विभागात शिक्षण सप्ताह २०२४ अंतर्गत आज गुरुवार दि. २५ जुलै २०२४ रोजी माजी विद्यार्थीनी रागेश्री धुमाळ (संगीत दिग्दर्शक, संगीत संयोजक, आर्टिस्ट) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
मान्यवर रागेश्री धुमाळ शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सौ. शीतल पवार, ज्येष्ठ शिक्षिका सौ. अनिता आहिरे तसेच श्री संजय आहिरे यांच्या शुभहस्ते कलेची देवता सरस्वतीचे पूजन करण्यात आले. इयत्ता ६ वी च्या विद्यार्थ्यांनी प्रमुख अतिथी रागेश्री धुमाळ यांची प्रकट मुलाखत घेऊन कार्यक्रमास प्रारंभ केला.
आपल्या मनोगतातून मान्यवरांनी संगीत साधना कशी करावी, याविषयी मार्गदर्शन केले. संगीत क्षेत्राविषयी सखोल माहिती विद्यार्थ्यांना अवगत केली. सरतेशेवटी आपल्या प्रत्यक्ष गायनातून उपस्थितांचे मन मोहून टाकले. विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद देत साथ दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. अनिता आहिरे, सौ. पूजा पाटील, श्री. संजय आहिरे, श्री. दीपक पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.