Friday, May 9, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMumbai Rain : मुंबईत होणार २६ जुलैची पुनरावृत्ती? हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा

Mumbai Rain : मुंबईत होणार २६ जुलैची पुनरावृत्ती? हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा

जाणून घ्या पुढील १५ दिवसांत कसे असेल मुंबईतील पावसाचे वातावरण?

मुंबई : काल रात्रीपासून मुंबईसह महाराष्ट्रात (Maharashtra) मुसळधार सरी कोसळत आहेत. अनेक ठिकाणी पूरजन्य स्थिती निर्माण झाली असून नागरिकांचेही मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसून येत आहेत. सलग पाच सहा दिवस पावसाच्या धारा (Heavy Rain) कोसळत असल्यामुळे, सखल भागात पाणी साचल्यामुळे वाहतूक सेवा देखील विस्कळीत झाली आहे. अशातच हवामान विभागाने पुढील पंधरा दिवस मुंबईत पावसाचे थैमान असेच कायम असणार असल्याचा अंदाज दिला आहे. त्यामुळे २६ जुलै २००५ साली निर्माण झालेल्या मुंबईपूराच्या कटू आठवणी डोळ्यांसमोर येऊन मुंबईकरांची चिंता आणखी वाढू लागली आहे.

हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे, आज मुंबईमध्ये ६० ते ७० प्रतितास किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यासोबत मुंबईमध्ये पुढील दोन आठवड्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने पुढील दोन आठवडे कसा पाऊस पडणार आहे याचा अंदाज व्यक्त केला आहे. जाणून घ्या कसे असेल मुंबईतील वातावरण.

  • २५ जुलै – ठराविक ठिकाणी प्रचंड पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
  • २६ जुलै – विजांच्या कडकडाटासहीत मुंबईमध्ये पाऊस पडेल असा अंदाज आहे.
  • २७ जुलै – शनिवारीही मुंबईमध्ये विजांच्या कडकडाटासहीत पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.
  • २८ जुलै – रविवारी मुंबईकरांना सूर्याचं दर्शन होऊ शकतं आणि पाऊस विश्रांती घेईल असा अंदाज आहे.
  • २९ जुलै – सोमवारी रविवारच्या तुलनेत कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
  • ३० जुलै – ३० जुलैपासून पुढील ९ दिवस जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस मुंबईकरांना पहायला मिळेल असा अंदाज आहे.
  • ३१ जुलै – बुधवारीही मुंबईमध्ये विजांच्या कडकडाटासहीत पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.
  • १ ऑगस्ट – महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबईत तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.
  • २ ऑगस्ट – पुढल्या शुक्रवारी मुंबईमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस पडून फ्लॅश फ्लडची शक्यता आहे.
  • ३ ऑगस्ट – या दिवशीही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
  • ४ ऑगस्ट – पुढल्या रविवारी मुंबईत विजांच्या कडकडाटासहीत पावसाची शक्यता आहे.
  • ५ ऑगस्ट – या दिवशीही आधीच्या दिवसासारखी स्थिती असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
  • ६ ऑगस्ट – सलग तिसऱ्या दिवशीही मुंबईत विजांच्या कडकडाटासहीत पाऊस पडेल असा अंदाज आहे.
  • ७ ऑगस्ट – तीन दिवसांनंतर मुंबईकरांना पुढल्या बुधवारी सूर्याचं दर्शन होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
  • ८ ऑगस्ट – या दिवशीही सूर्यदर्शन होईल. मात्र तुरळक पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज आहे.

दरम्यान, हवामान संस्थेने दिलेला अंदाज पाहता मुंबईकरांचा पुढील दोन आठवडे पावसाचा प्रवास करावा लागणार असून गरज असेल तरच घराबाहेर पडा असे आव्हान देखील केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -