Friday, May 9, 2025
Homeक्रीडाRahul Dravid: टीम इंडियानंतर आता राहुल द्रविड बनू शकतात या संघाचे प्रशिक्षक

Rahul Dravid: टीम इंडियानंतर आता राहुल द्रविड बनू शकतात या संघाचे प्रशिक्षक

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड(rahul dravid) यांनी आयसीसी टी-२० वर्ल्डकप विजयानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला. टीम इंडियासोबत राहुल द्रविडचा करार या स्पर्धेपर्यंत होता. आयसीसी वनडे वर्ल्डकपच्या फायनलमधील पराभवानंतर त्यांचा करार बीसीसीआयने टी-२० वर्ल्डकपर्यंत वाढवला होता. या स्पर्धेत जेतेपद पटकावल्यानंतर त्यांनी प्रशिक्षकपदाला अलविदा म्हटले.

आता ते इंडियन प्रीमियर लीगच्या फ्रेंचायजी टीम राजस्थान रॉयल्ससोबत ते काम करू शकतात. २००८मध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या आयपीएलमध्ये राजस्थानने विजय मिळवला होता.

राहुल द्रविड हे प्रशिक्षकपदापासून दूर झाल्यानंतर आता त्यांचा पुढील प्रोजेक्ट काय असणार आहे याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना आहे. मिडिया रिपोर्टनुसार इंडियन प्रीमियर लीगमध्ये राहुल द्रविडचे कोच म्हणून पुन्हा पुनरागमन होऊ शकते. आपल्या जुन्या संघासोबत ते पुन्हा जोडले जाऊ शकतात. या संघाकडून खेळलेल्या राहुल द्रविड यांनी कर्णधार म्हणून दीर्घकाळ या फ्रेंचायझीला आपली सेवा दिली आहे. दरम्यान, रिपोर्टमध्ये सांगितल्याप्रमाणे राजस्थानच्या संघाशी बातचीत सुरू आहे आणि लवकरच याची घोषणा केली जाऊ शकते.

राजस्थानसोबत राहुलचे करिअर

५१ वर्षीय राहुल द्रविडने राजस्थान रॉयल्ससोबत कर्णधार म्हणून खेळी केली आहे. त्यांनी २०१३मध्ये चॅम्पियन्स लीग टी-२० फायनलमध्ये पोहोचवले होते. द्रविडच्या नेतृत्वात खेळताना राजस्थानचा संघ प्लेऑफमध्येही खेळला होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -