मुंबई: भारतीय महिला संघाने सलग दुसऱ्या विजयासह आशिया कपच्या सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. पाकिस्तानला हरवल्यानंतर यूएईविरुद्ध भारताने ७८ धावांनी मोठा विजय मिळवला. ऋचा घोषच्या तुफानी अर्धशतक आणि हरमनप्रीत कौरच्या कर्णधारीला साजेशी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना यूएईविरुद्ध ५ बा २०१ धावसंख्या उभारली होती. मात्र आव्हानाचा पाठलाग करताना यूएईचा संघ ७ बाद १२३ धावाच करू शकला.
महिला आशिया कपमध्ये भारताने यूएईविरुद्ध रविवारी मोठ्या विजयासह सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के केले. टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाने कर्णधार हरमनप्रीत कौरने कठीण वेळेस येता शानदार अर्धशतक ठोकले. यानंतर अखेरीस ऋचा घोषच्या विस्फोटक खेळीने संघाला दोनशे धावांचा टप्पा गाठून दिला. स्मृती मंधानाला या सामन्यात १३ धावा करता आल्या. तर शेफाली वर्माने ३७ धावांचे योगदान दिले. ३ विकेट झटपट पडल्यानंतर कर्णधार हरमनप्रीतने ४७ बॉलमध्ये ६६ धावांची खेळी केली.
ऋचा घोषचे तुफान अर्धशतक
सहाव्या स्थानावर फलंदाजीसाठी उतरलेल्या ऋचा घोषने केवळ २६ बॉलमध्ये ९ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने तुफानी अर्धशतक ठोकले. महिला आशिया कपच्या इतिहासात ऋचा टी-२० मध्ये अर्धशतक ठोकणारी पहिली विकेटकीपर बनली आहे. भारतीय संघाने स्पर्धेत २०० धावांचा स्कोर करत इतिहास रचला.