Amazon सेलमध्ये १० हजारांपेक्षाही कमी किंमतीत मिळत आहेत जबरदस्त स्मार्टफोन

Share

मुंबई: प्राईम युजर्ससाठी अॅमेझॉनचा प्राईम डे सेल सुरू झाला आहे. हा सेल २१ जुलै रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत असणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या बंपर सेलमध्ये इलेक्ट्रिक डिव्हाईसवर दमदार डिस्काऊंट तसेच ऑफर्स मिळत आहेत. येथे आम्ही तुम्हाला अशा काही स्मार्टफोनबद्दल सांगत आहोत जे तुम्ही १० हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता.

POCO M6 Pro 5G

POCO M6 Pro 5Gमध्ये 50MP + 2MP ड्युअल प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय यात सेल्फी लव्हर्ससाठी ८एमपी सेल्फी कॅमेराही देण्यात आला आहे. या फोनमध्ये Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसर देण्यात आला आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास 5000mAh चा बॅटरी बॅकअप मिळत आहे. फोनचा डिस्प्ले मजबूत ठेवण्यासाठी Corning Gorilla Glass Protection देण्यात आले आहे. प्राईम डे सेलमध्ये हा फोन तुम्हाला ९ हजार ९९८ रूपयांना मिळेल.

Redmi 13C 5G

Redmi 13C 5G या फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 6100+ चिपसेट आहेत. फोटोग्राफी करण्यासाठी या फोनमध्ये तुम्हाला 50MP प्रायमरी सेन्सरसह यात एआय केमही देण्यात आला आहे. यात 5MP फ्रंट कॅमेराही देण्यात आला आहे. यात 18W फास्ट चार्जिंगसह 5000mAhची बॅटरी लाईफ देण्यात आली आहे. प्राईम डे सेलमध्ये या फोनवर एक हजार रूपयांचे डिस्काऊंट कूपन मिळत आहे. कूपनचा वापर करून युजर हा फोन ९,४९९ रूपयांना खरेदी करू शकतात.

iQOO Z9 Lite

iQOOने हा फोन नुकताच सादर केला. यानंतर अॅमेझॉन प्राईम डे सेलमध्ये आणला आहे. Z9 Lite
मध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ६३०० इतकी आहे. फोनच्या बॅकमध्ये 50MP+2MP कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी घेण्यासाठी यात 8MP फ्रंट कॅमेरा आहे. यात 5000mAhची बॅटरी लाईफ आहे. अॅमेझॉन सेलमध्ये हा फोन केवळ ९,९९९ रूपयांना मिळत आहे.

Nokia G42 5G

या सेलमध्ये Nokia चा परवडणारा फोन घेण्याचीही संधी मिळत आहे. या फोनमध्ये ओक्टाकोर स्नॅपड्रॅगन ४८० प्लस ५जी प्रोसेसर देण्यात आला आहे. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे तर यात 50MPचा प्रायमरी कॅमेरा, २एमपी डेप्थ सेन्सॉर आणि २ एएमपीचा मॅक्रो लेन्स आहेत. याशिवाय या फ्रंटला 8MP कॅमेरा देण्यात आला आहे. यात 5000mAhची बॅटरी आहे. अॅमेझॉन सेलमध्ये तुम्हाला हा फोन केवळ ९,४९९ रूपयांना मिळेल.

Recent Posts

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

2 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

2 hours ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

3 hours ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

3 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

3 hours ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

4 hours ago