मुंबई: देशातील सगळ्यात मोठे बिझनेसमन मुकेश अंबानी यांचा छोटा मुलगा अनंत अंबानी नुकताच विवाहबंधनात अडकला. अनंत अंबानीचे १२ जुलैला जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये लग्न पार पडले. या दरम्यान देश-परदेशातील पाहुण्यांनी हजेरी लावली होती. बॉलिवूडच्या शहनशाह अमिताभ बच्चनपासून ते दक्षिणेचे दिग्दर्शक एटली कुमार हे या लग्नात सामील झाले होते.
आता अशी बातमी समोर येत आहे की अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नासाठी एटली कुमार यांनी १० मिनिटांची अॅनिमेटेड फिल्म बनवला आहे. याची माहिती एका यूट्यूबरने दिली आहे.
एटलीने बनवला सिनेमा, बिग बींचा आवाज
यूट्यूबरने सांगितले की लग्नाच्या दुसऱ्या दिवशी लग्नात आलेल्या पाहुण्यांसाठी १० मिनिटांचा एक सिनेमा रिलीज करण्यात आला. याला एटली यांनी दिग्दर्शित केले होते. हा एक अॅनिमेटेड सिनेमा होता आणि व्हॉईसओव्हर अमिताभ बच्चन यांनी केला होता.
१२ ते १४ जुलै दरम्यान होते कार्यक्रम
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचे कार्यक्रम १२ ते १४ जुलैदरम्यान रंगले होते. १२ जुलैला जोडप्याने सात फेरे घेतले होते. १३ जुलैला मंगल आशीर्वाद कार्यक्रम होता यात पंतप्रधान मोदीही आशीर्वाद देण्यासाठी आले होते. १४ जुलैला अनंत-राधिकाचा वेडिंग रिसेप्शनचा कार्यक्रम होता. यात अनेक बॉलिवूड स्टार पोहोचले होते.