मुंबई: जिओ आपल्या ग्राहकांसाठी त्यांच्या गरजेनुसार विविध प्रकारचे प्लान ऑफर करत असते.आज आम्ही तुम्हाला जिओच्या २८ दिवसांची व्हॅलिडिटी असलेल्या सगळ्यात स्वस्त प्लानबद्दल सांगत आहोत.
हा प्रीपेड प्लान १८९ रूपयांचा आहे. या प्रीपेड प्लानमध्ये २८ दिवसांची व्हॅलिडिटी दिली जाते. या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगचे फायदेही दिले जातात.
सोबतच ३०० एसएमएस आणि २ जीबी हाय स्पीड डेटाही मिळेल. दरम्यान, २ जीबी डेटा संपल्यानंतर याचा स्पीड कमी होऊन ६४ केबीपीएस होईल.
जिओच्या या प्लानमध्ये तुम्हाला जिओ टीव्ही तसेच जिओ सिनेमा या दोघांचाही अॅक्सेस दिला जात आहे. दरम्यान, यात तुम्हाला जिओ सिनेमाचा प्रिमियम अॅक्सेस मिळणार आहे.
हा प्लान अशा लोकांसाठी ज्यांना कॉलिंगची गरज आहे. तसेच ते डेटाचा वापर अधिक करत नाही. त्यांच्यासाठी हा प्लान जबरदस्त आहे.