टाळ बोले चिपळीला…

Share

हलकं-फुलकं – राजश्री वटे

आली कुठूनशी कानी धून…
पहाटेचे सूर्यकिरणं धरतीवर उतरताना पक्ष्यांच्या किलबिलाटात दुरून भक्तिगीत कानावर येतं…
मन ताजतवानं होऊ लागतं, रोमारोमात भक्ती उचंबळून यायला लागते, गात्र न् गात्र भक्तिमय होत जातं!
“टाळ बोले चिपळीला” या भजनाचे बोल जगदीश खेबूडकर लिखित… किती भावाशय आहे या शब्दांत…
खरंच… ती दोघे बोलतात…

टाळाची कीणकीण… त्यासंगे चिपळ्यांची लयबद्ध हालचाल… एकाने स्वर धरला की दुसरा साथीला ताल धरतो… मग सुरू होते जुगलबंदी भजनाच्या तालावर!!
भक्तिगीतातील शब्दाचे अर्थ जसे उलगडत जातात, तसे मनामध्ये झिरपत जातात अन् त्या संगीतमय शब्दांना ताल देतात छोटे छोटे वाद्य… टाळ, मृदंग, चिपळ्या, घुंगरू, डफली, तबला, पेटी, एकतारी…

भजनाला साथ द्यायला… बस… एवढे पुरे!! इतकी छान साथसंगत एकमेकांची… मस्त सांगड जमते या वाद्यांची… वातावरण दुमदुमून जातं… भक्तिगीताला फक्त कोणत्याही दोन वाद्यांची गरज असते… पण ते असे काही ठेका धरतात… ते गाणं इतक्या उंचीवर घेऊन जातात की ऐकणारा तल्लीन होऊन जातो. दोन कडव्यांची मधली जागा म्हणजे दोन वाद्यांची जबरदस्त जुगलबंदी… टाळ नाही तर मृदंग… भारावून टाकतं… तन आणि मनसुद्धा!!
तबल्यावर थाप पडली की, पेटीच्या काळ्या-पांढऱ्या पट्ट्या नाचायला लागतात ताल पकडून…
टाळ-चिपळी बोलायला लागले की, त्यांच्यात मृदंग ही शामील… मग काय विचारता नुसती धमाल… कुठल्या कुठे ठेवतो ऐकणाऱ्याला… ब्रह्मानंदी टाळी लागलीच पाहिजे!

हलकेच ती बासरी येते सूर लावत, हीचं काम फार नाजूक, कानात शीळ घुमते तिची हळुवार… राधेला वेड लावलं होतं हिच्या नादमाधुरतेनं…
कान्हा वाजवे बासरी…
अन् होते राधा बावरी…
एकतारी संगे एकरूप झालो…
या भक्तिगीतातील फक्त एकतारीच्या झंकारण्यावर सगळे भक्त विठ्ठलाच्या भजनात आकंठ न्हाऊन निघतात… बाकी वाद्यांची गरज भासली नाही इथे… ईश्वर चरणी लीन होण्यासाठी!!
देवा श्रीगणेशा…

मोठमोठे ढोलताशे एकमेकांना साद घालत टाळ धरतात… हृदयाची धडधड वाढते… कानशीलं गरम व्हायला लागतात… गात्रागात्रात ढोल घुमत जातो… नुसता जोष, भक्तीचा जल्लोष, आसमंत दणदणून जातं!!
विठ्ठल… विठ्ठल… विठ्ठल… विठ्ठल…
आसमंतात गुंजून जातो वाद्यांचा ताल, सूर आणि… भक्तीच भक्ती!!
पाय ठेक्यावर मागे-पुढे करत…
टाळ बोले चिपळीला, नाच माझ्या संगे…
मग चिपळी बोले… नाच नाचूनी अति मी दमले आता जाईन पंढरपुरा
पाहीन पांडुरंगा…
उभी पंढरी नादावली…
माऊली माऊली
माऊली माऊली
रूप तुझे लई भारी
दंगली रंगली सारी पंढरपुरी!!

Recent Posts

India Pakistan war : भारत-पाकिस्तान यांच्यातील वादामध्ये हस्तक्षेप करणार नाही, अमेरिकेचे मोठे विधान

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…

34 minutes ago

India-Pakistan War: राजौरी-पूंछमध्ये LOC वर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये रात्रभर ब्लॅकआऊट

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…

57 minutes ago

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

5 hours ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

5 hours ago

रोहित शर्मा:रॅग्ज टु रिचेस कहाणी

उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…

6 hours ago

India Pakistan War News : पाकड्यांना भारताचे जोरदार प्रत्युत्तर! कराची बेचिराख!

सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…

6 hours ago