मुंबई : मुसळधार पावसाने महाराष्ट्रासह (Maharashtra Rain) राज्यभर चांगलीच हजेरी लावली आहे. काही दिवसांपासून मुंबईमध्येही (Mumbai) पावसाने जोर धरल्याचे दिसून येत आहे. जोरदार पावसामुळे वाहतूकसेवा विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडत आहे. अशातच आज अनेक जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळणार (Heavy Rain) असल्यामुळे हवामान विभागाने (IMD) काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर गरज असल्यास घराबाहेर पडा असे आवाहन हवामान विभागाने दिले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ११ जुलैपासून मान्सूनचा वेग वाढला असून तो आणखी दोन ते तीन दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. तसेच आज ठाणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट तर मुंबईसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाने आज घाट भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्याचबरोबर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. याशिवाय रायगडमध्ये काही ठिकाणी १०० मिमीहून अधिक पावसाची शक्यता असल्यामुळे रायगडमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला.
दरम्यान रायगड आणि रत्नागिरीसाठी हवामान विभागाने काल रेड अलर्ट जारी केला होता. तर आज घाट परिसरात काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद होऊ शकते आणि सातारा आणि कोल्हापूरमध्ये मैदानी भागात मध्यम पाऊस पडू शकतो, असे सांगितले आहे.
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…
मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…