चंद्राबाबू नायडू आणि एकनाथ शिंदे यांच्यात काय झाली चर्चा?
मुंबई : आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांनी आज आपल्या मुंबई भेटीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची वर्षा बंगल्यावर सदिच्छा भेट घेतली.
या भेटीत एकमेकांना लागून असलेल्या आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांतील परस्पर सहकार्य वाढवून दोन्ही राज्याचा विकास कसा साधता येईल याबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.
यावेळी त्यांच्यासह केंद्रीय मंत्री राममोहन नायडू आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हेदेखील उपस्थित होते.