‘टेक’जगतात नवं काय?

Share

सायली शिगवण

मोबाइल, ऑटो तसेच टेलिकॉम क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये तंत्रविश्वात अनेक लक्षवेधी घडामोडी घडल्या. या घटनांमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे, हे दिसून आले. दुसरीकडे ऑटो जगतातल्या काही महत्त्वपूर्ण बाबींनीही जनसामान्यांचे तसेच ठरावीक वाहनांच्या चाहत्यांचे लक्ष वेधले. बाजारातील विक्रीला तसेच ग्राहकवर्गाच्या पसंतीला नवे आयाम देऊ शकणाऱ्या अशाच काही घडामोडींचा हा खास मागोवा.

गेल्या काही दिवसांमध्ये टेक जगतात लक्षवेधी घडामोडी घडल्या. या घटनांमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे, हे दिसून आले. सार्वत्रिक निवडणुका संपताच दूरसंचार कंपन्यांनी मोबाइलच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली. जिओ, एअरटेल आणि व्ही या कंपन्याचे रिचार्ज प्लॅन्स १५ ते २० टक्क्यांपर्यंत महाग करण्यात आले. यामुळे ग्राहकांच्या मोबाइलचे बील आता चांगलेच वाढणार आहे. असे असले तरी या दरवाढीमुळे दूरसंचार कंपन्यांना व्यवसाय विस्तारासाठी आणि सेवेचा दर्जा वाढवण्यासाठी अत्यावश्यक असा निधी उभा करता येणार आहे. जिओच्या बाबतीत बोलायचे तर ही कंपनी रिलायन्सच्या छत्रछायेतून बाहेर काढून एक स्वतंत्र ओळख असलेली मोठी कंपनी म्हणूनही मान्यता मिळवू शकते. त्यामुळे सामान्यांना दरवाढीच्या चरकात अडकवले तरी उद्या उत्तम, वैविध्यपूर्ण सेवा देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. शिवाय या दरांमध्ये गेली तीन वर्षे कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती, हेही लक्षात घ्यायला हवे.

जिओ फोनधारकांसाठी दुसरी दखलपात्र बाब म्हणजे ‘जिओ सेफ’ आणि ‘जिओ ट्रान्सलेट’ ही दोन ॲप्सही लाँच करण्यात आली आहेत. ‘जिओ सेफ’मध्ये व्हीडिओ कॉलर, व्हॉईस कॉलर, मेसेजेस, फाईल ट्रान्सफर असे व्हॉट्सॲपसारखे काही फीचर्स देण्यात आले आहेत. पण महत्त्वाची बाब अशी की, त्यासाठी तुम्हाला दरमहा २०० रुपये मोजावे लागणार आहेत. तर दरमहा ९९ रुपये भरून ‘जिओ ट्रान्सलेट’ हे ॲप तुम्ही वापरू शकता. हे ॲप एआयचा उपयोग करून व्हॉईस कॉल्स, मेसेजेस भाषांतरीत करते. दरम्यान, एक वर्षासाठी ही दोन्ही ॲप्स ग्राहकांना मोफत मिळणार असल्याची घोषणा ‘जिओ’ने केली आहे. दरम्यान, ‘बीएसएनएल’ कर्नाटकमध्ये फोर-जी नेटवर्क लाँच करणार आहे. कर्नाटकमधील म्हैसूर, मंड्या, चमराजनगर आणि कोडागू येथे हे नेटवर्क लाँच होणार आहे. हे नेटवर्क पुढे जाऊन फाईव्ह-जीमध्ये बदलण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सेवा नीट देता यावी यासाठी या भागात ६९० टॉवर्स बांधण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. या भागांमधल्या ७९ जागांवर नेटवर्कच नाही. त्यामुळे इथे नेटवर्क देणारी ‘बीएसएनएल’ ही पहिलीच कंपनी ठरली.

भारतामध्ये अलीकडेच नवा टेलिकम्युनिकेशन ॲक्ट लागू करण्यात आला. या ॲक्टचे काही विभाग लागू करण्यात आले आहेत. या ॲक्टच्या मुद्द्यांनुसार, सरकारने आणीबाणीची परिस्थिती नीट हाताळण्यासाठी वापरकर्त्यांच्या फोनचे नियंत्रण राखून ठेवले आहे. या ॲक्टमध्ये वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही नियम आणि अटी लागू करण्यात आल्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये एखादी व्यक्ती आपल्या नावावर जास्तीत जास्त नऊ सीमकार्ड्स घेऊ शकते. या सोबतच जम्मू आणि काश्मीर तसेच ईशान्य भारतातील नागरिकांसाठी सीमकार्डची मर्यादा नऊपेक्षा कमी ठेवण्यात आलेली आहे. दरम्यान, एखाद्याने नऊपेक्षा जास्त सीमकार्ड्स खरेदी केली तर त्याला ५० हजार रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो. दरम्यान, ऑटोमोबाइल क्षेत्रातही नवीन घडामोडी घडल्या आहेत. सध्या इलेक्ट्रॉनिक गाड्यांची चलती आहे. इलेक्ट्रिक गाड्यांच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशातच फ्रेंच कार निर्माता कंपनी ‘सिट्रोन’ने आपली नवी इलेक्ट्रिक कार ‘सी-३ एअरक्रॉस ईव्ही’ युरोपियन मार्केटमध्ये लाँच केली आहे.

आकर्षक लूक आणि दमदार इलेक्ट्रिक मोटर असणारी ही सात सीटर कार कंपनीने पेट्रोल आणि हायब्रिड व्हेरिएंटमध्येही सादर केली आहे. नवी ‘सी-३ एअरक्रॉस ईव्ही’ युरोपियन बाजारपेठेत २७,४०० युरो (जवळपास २४.४७ लाख रुपये) या किमतीमध्ये लाँच करण्यात आली आहे. गाडीच्या पेट्रोल व्हेरिएंटची किंमत १९,४०० युरो (१७.३३ लाख) आणि हायब्रीड व्हेरिएंटची किमत २५,५०० युरो (२२.७८ लाख रुपये) इतकी आहे. ४.३९ मीटर लांबीची ही कार पाच आणि सात सीटर अशा दोन प्रकारांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. बॉक्सी डिझाईन असणाऱ्या या एसयूव्हीमध्ये कंपनीने एलईडी हेडलँप, रिअर पार्किंग सेन्सर कॅमेरा, हेड अप डिस्प्ले, १०.२५ इंफोटेंमेंट सिस्टीम आणि वायरलेस चार्जिंगसारखी फीचर्स दिली आहेत.

अलीकडेच टाटा मोटर्सने आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किमती दोन टक्क्यांनी वाढवल्या. कंपनीचे म्हणणे आहे की, किमतीतील वाढ सर्व व्यावसायिक वाहनांच्या श्रेणीवर लागू होईल आणि ही वाढ वेगवेगळ्या मॉडेल्स आणि प्रकारांनुसार बदलेल. गेल्या एका महिन्यांत टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये ३.४० टक्के वाढ झाली. त्याच वेळी या स्टॉकने गेल्या सहा महिन्यांमध्ये ३४.९३ टक्के आणि एका वर्षात ७३.७७ टक्के परतावा दिला. २०२३-२४ मध्ये टाटा मोटर्सचा नफा शंभर टक्क्यांपेक्षा जास्त वाढून ३१,८०७ कोटी रुपये झाला. टाटा मोटर्सचा महसूल वाढून ४.३७ लाख कोटी रुपयांवर पोहोचला, हा कंपनीचा कोणत्याही वर्षातील सर्वाधिक महसुलाचा विक्रम आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये महसूल ३.४५ लाख कोटी रुपये होता. म्हणजेच महसुलात २६.५८ टक्के वाढ झाली. टाटा मोटर्स समूहाचे मुख्य वित्तीय अधिकारी पी. बी. बालाजी म्हणाले की, टाटा मोटर्स समूहाने आतापर्यंतचा सर्वाधिक महसूल आणि नफा नोंदवला आहे. आमचा भारतातील व्यवसाय आता कर्जमुक्त झाला आहे आणि आम्ही २०२५ पर्यंत एकत्रित आधारावर कर्जमुक्त होण्याच्या मार्गावर आहोत.

आता व्हॉट्सॲपच्या अपडेटबद्दलची एक लक्षवेधी माहिती. आपले ॲप सुरळीत चालावे आणि सुरक्षित राहावे म्हणून व्हॉट्सॲप सतत काही ना काही अपडेट करत असते. आता व्हॉट्सॲप वापरकर्त्यांसाठी कंपनीने एक अपडेट दिले आहे. जुन्या स्मार्टफोन्समध्ये आता व्हॉट्सॲप बंद होणार आहे. सॅमसंग, मोटोरोला, हुआवे, सोनी, एलजी आणि ॲपल या ब्रँड्सच्या सुमारे ३५ मोबाइल फोन्समध्ये यापुढे व्हॉट्सॲप अपडेट्स किंवा सेक्युरिटी पॅच मिळणार नाहीत. कंपनीने व्हॉट्सॲपची कार्यक्षमता आणि सुरक्षा वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. गॅलेक्सी नोट ३, गॅलेक्सी एस ३ मिनी आणि गॅलेक्सी एस ४ मिनीसारखे फोन तसेच मोटोरोलाचे मोटो जी आणि ॲपलचे आयफोन ६ आणि आयफोन एसईदेखील व्हॉट्सॲपला सपोर्ट करणार नाहीत. त्यामुळे व्हॉट्सॲप फक्त अँड्रॉईड ५.० किंवा त्यापुढील आवृत्ती आणि आयएसओ १२ किंवा त्यापुढील आवृत्तीला सपोर्ट करेल. याचा अर्थ यापेक्षा जुन्या सिस्टीमवर चालणाऱ्या कोणत्याही फोनला यापुढे व्हॉट्सॲपचे महत्त्वाचे अपडेट मिळणार नाहीत. दरम्यान, ऑटोजगतात एका बातमीची चर्चा आहे. लवकरच रॉयल एनफिल्डच्या गुरिल्ला-४५०चे अधिकृत लाँच बार्सिलोनामध्ये होणार आहे.

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ लाल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गोवदराजन बालकृष्णन यांनी ही घोषणा केली आहे. ही बाईक तिच्या डीव्ही काऊंटरपार्टच्या तुलनेत अधिक परवडणारी असेल अशी अपेक्षा आहे. बार्सिलोनानंतर ही बाईक भारतासह जगातील इतर देशांमध्येही लाँच केली जाऊ शकते. गुरिल्ला ४५० ची अपेक्षित किंमत २.३०-२.४० लाख रुपये आहे. गुरिल्ला-४५० चे काही फोटो आणि व्हीडिओ समोर आले. त्यानुसार, बाईकमध्ये सगल-पॉड इन्स्ट्रुमेंट कंसोल, गोल एलईडी हेडलाइट, मोठी इंधन टाकी आणि वन-पीस सीट यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. गुरिल्ला ४५० मध्ये अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर आहेत. याशिवाय या बाईकमध्ये हिमालयनमध्ये दिलेल्या यूएसडी फोर्कऐवजी गेटर्ड टेलिस्कोपिक फोर्क फीचर आहे. असे म्हटले जात आहे की, आगामी रॉयल एनफिल्ड गुरिल्ला ४५० मोटरसायकल भारतातील वाढत्या ४००+ सीसी मोटरसायकल सेगमेंटला पुढे घेऊन जाईल. या मोटारसायकलमध्ये वैविध्यपूर्ण क्षमता असेल अशीही अपेक्षा आहे.

Recent Posts

नालेसफाई नव्हे, ही तर भ्रष्टसफाई! पालकमंत्री आशिष शेलार यांचा थेट हल्ला

मुंबई : "३५ दिवसांत फक्त १० टक्के नालेसफाई? मग उरलेली रक्कम कुठं गेली?" असा थेट…

18 minutes ago

‘ऑपरेशन सिंदूर’ अजूनही सुरुच! दहापट उत्तर देणार, पाकिस्तानची घाबरगुंडी, केंद्राची सर्वपक्षीय ताकद एकवटली

नवी दिल्ली : भारताच्या यशस्वी ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरही पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघन थांबलेले नाही. या पार्श्वभूमीवर केंद्र…

40 minutes ago

Operation Sindoor : पाकव्याप्त काश्मीरमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’!

पाकिस्तानची दोन लढाऊ विमाने नष्ट देशभरात मॉकड्रील करण्यापूर्वीच भारताने पहलगाम हल्ल्याचा सूड उगवलाय. पाकिस्तान झोपेतून…

43 minutes ago

पाकिस्तानमधील हवाई संरक्षण यंत्रणा भारताच्या ड्रोन हल्ल्यात उद्ध्वस्त

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये २६ नागरिकांची हत्या केली. नंतर…

45 minutes ago

Operation Sindoor : का दिलं ऑपरेशन सिंदूर नाव?

भारताने पहलगाम हल्ल्याचा सूड उगवलाय. हा सूड उगवण्यासाठी दहशतवादी ठिकाणांवर तिन्ही सैन्य दलांनी संयुक्त कारवाई…

55 minutes ago

शरद पवारांचा ‘पॉलिटिकल स्ट्राईक’; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? काका-पुतण्या एकत्र येणार का?

मुंबई : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा कमालीची हालचाल दिसून येत आहे. दस्तुरखुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक…

1 hour ago