Friday, May 9, 2025
Homeक्राईमPune Crime : नात्याला कलंक! चारित्र्याच्या संशयावरुन बायकोची गळा दाबून हत्या

Pune Crime : नात्याला कलंक! चारित्र्याच्या संशयावरुन बायकोची गळा दाबून हत्या

आत्महत्येचा रचला बनाव; मात्र पोलिसांनी उलगडला आरोपीचा कट

पुणे : पुण्यात सातत्याने गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालल्याचे दिसून येत आहे. (Pune Crime) मर्डर, बलात्कार, दरोडा अशा अनेक प्रकारच्या घटना घडल्याचे समोर येत असताना आणखी एक भयंकर प्रकार पुण्यात घडल्याचे उघडकीस आले आहे. पत्नीचे बाहेर अनैतिक संबंध असल्याचा संशयावरुन पतीनेच त्याच्या बायकोचा जीव (Murder Case) घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पतीने पत्नीचा गळा दाबून जीव घेऊन बनावट कट रचला. मात्र पोलिसांनी आरोपी पतीचा प्लॅन उघड करून त्याला अटक केली. दरम्यान नवरा बायकोच्या पवित्र नात्याला कलंक लावणाऱ्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या सहकारनगरमधील धनकवडी परिसरात ही धक्कादायक घटना घडली. आरोपी स्वप्नील शिवराम मोरे (३०) व मृत महिला अंजली मोरे (२९) यांचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना दोन मुले आहेत. मात्र स्वप्नीलचा त्याच्या पत्नीवर बाहेर अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्यांच्यामध्ये सतत या कारणांमुळे भांडणे होत. मात्र राग अनावर झाल्यामुळे पतीने आज त्याच्या बायकोची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिने आत्महत्या केल्याचा त्याने बनाव रचला.

दरम्यान, अंजली या गळफास लावलेल्या अवस्थेत राहत्या घरात आढळून आल्या. नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी हा प्रकार पाहिल्यानंतर तिला लगेच रुग्णालयात दाखल केले. तेव्हा त्यांना डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी कडक तपास सुरु केला. पत्नीच्या मृत्यूनंतर आरोपी पती काही न केल्यासारखं वागत आहे, अशी माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपीने हत्येची कबूली दिली. त्याने पत्नीचा गळा दाबून खून केला, नंतर तिला फासावर लटकवून तो बाहेर पडला असे त्याने सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -