Friday, May 9, 2025
Homeब्रेकिंग न्यूजNitesh Rane : दिशा आणि सुशांतचा खुनी आदित्य ठाकरे हा मिहिर शाहचा...

Nitesh Rane : दिशा आणि सुशांतचा खुनी आदित्य ठाकरे हा मिहिर शाहचा डुप्लिकेट!

नितेश राणे यांचा घणाघात

उद्धव ठाकरे स्पाईनलेस : नितेश राणे

मुंबई : ‘महाराष्ट्राचे गृहमंत्री हे युजलेस आहेत, असा उल्लेख संजय राजाराम राऊतने केला. त्याला स्वतःचा मालक उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हा स्पाईनलेस आहे, हे त्याला अजूनपर्यंत दिसलं नाही. मराठा आणि ओबीसी आरक्षणावर अजूनपर्यंत यांची थेट भूमिका काय आहे, ते मांडण्याची यांची हिंमत नाही आणि दुसऱ्यांना यूजलेस म्हणण्याअगोदर तुझा मालक उद्धव ठाकरे किती मोठा स्पाईनलेस आहे, याचा आधी तू अंदाज घे’, असा घणाघात नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला. आजच्या पत्रकार परिषदेत नितेश राणे यांनी ठाकरे कुटुंबिय व संजय राऊत (Sanjay Raut) यांचा चांगलाच समाचार घेतला.

नितेश राणे म्हणाले, मिहिर शाहच्या केसमध्ये जेवढी तत्परतेने आमच्या सरकारने कारवाई केली, तेवढी तत्परता तुझ्या महाविकास आघाडीच्या सरकारने कधीच दाखवली नसती. जर तेवढ्याच प्रामाणिकपणे दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत यांच्यावर कारवाई झाली असती तर आज आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) जेलमध्ये असता, मिहिर शाहचं दुसरं रुप हे आदित्य ठाकरे आहे, तीच प्रवृत्ती आहे. त्यावेळेसही हे दोन्ही खून यांनी लपवले आणि म्हणून हा पेंग्विन बाहेर वळवळ करतोय.

पुढे नितेश राणे म्हणाले, मोठा वरळीमध्ये जाऊन खुनाचा गुन्हा दाखल करा, असं बोलण्याची हिंमत करतोय आणि स्वतःचे हात दिशा सालियनच्या आणि सुशांत सिंगच्या खुनात बरबटलेले आहेत, ते याला दिसत नाही. तेव्हा सगळे साक्षीदार, पुरावे, सीसीटीव्ही फुटेज नष्ट केले. केस पूर्णपणे दाबली, कमिशनरवर दबाव टाकला. हे सगळं वडील मुख्यमंत्री होते म्हणून शक्य झालं. आणि आता मिहिर शाहला कलम ३०२ खाली अटक करा, असं म्हणतो. पण या मिहिर शाहचा असली बाप, डुप्लिकेट हा आदित्य ठाकरे आहे. त्यामुळे जो नियम मिहिर शाहला लागतो, तोच या आदित्य ठाकरेला पण लागतो, असं नितेश राणे म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -