Friday, May 9, 2025
Homeक्रीडाटीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीत काही चाहते आजारी तर काही झाले जखमी

टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीत काही चाहते आजारी तर काही झाले जखमी

मुंबई: वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाच्या विजयाचा जल्लोष काही क्रिकेट चाहत्यांसाठी मात्र भारी ठरला. खरंतर, भारतीय क्रिकेट संघाला पाहण्यासाठी जमलेल्या लाखो क्रिकेट चाहत्यांच्या गर्दीमुळे अनेक चाहत्यांची तब्येत बिघडली. तर काही जखमी झाले. काहींना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.

पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १० लोकांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सूत्रांनी हे ही सांगितले की आठ लोकांवर उपचार करून तातडीने डिस्चार्ज देण्यात आला तर दोघांना उपचारासाठी अॅडमिट करून घेण्यात आले.

विजयी मिरवणुकीत चाहत्यांचा उत्साह शिगेला

बार्बाडोसच्या जमिनीवर दक्षिण आफ्रिकेला टी-२० वर्ल्डकप २०२४च्या फायनलमध्ये हरवत रोहित ब्रिगेडने तिरंगा फडकवला होता. भारतीय संघ मायदेशी परतल्यानंतर या क्रिकेट चाहत्यांनी अतिशय धामधुमीत भारतीय क्रिकेटर्सचे स्वागत केले. प्रत्येकजण आपल्या हातात झेंडा घेऊन चॅम्पियन्सची एक झलक पाहण्यासाठी मैदानात उतरला होता.

२९ जून २०२४ या दिवशी टीम इंडियाने केवळ एक सामना, स्पर्धा अथवा ट्रॉफी जिंकली नव्हती तर कोट्यावधी भारतीयांचा ११ वर्षांचा दीर्घ प्रतीक्षा काळ संपवला होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -