मुंबई: पावसाळ्याला सुरूवात झाली आहे. या मोसमात प्रत्येकाला आपले आरोग्य, त्वचा तसेच केसांची काळजी घेतली पाहिजे. जर तुम्ही याची काळजी घेतली नाही तर यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
पावसाळ्याचा हंगाम सुरू होताच केसगळती आणि त्वचेशी संबंधित समस्या होऊ लागतात. जर तुम्ही या मोसमात भिजत असाल तर भिजल्यानंतर तुमच्या केसांची योग्य ती काळजी घ्या. जर तुम्ही नीट काळजी घेतली नाही तर केस गळू लागतील आणि खराबही होऊ शकतात.
जाणून घेऊया पावसाच्या दिवसांत आपल्या केसांची काळजी कशी घ्यावी. जेव्हा पावसाने तुमचे केस भिजतील तेव्हा घरी येऊन आपले केस शँपूने चांगले धुवा आणि सुकवा. जेव्हा तुम्ही शँपू कराल तेव्हा बोटांच्या मदतीने हलक्या हातांनी स्काल्पला मसाज करा. यामुळे केसांमध्ये जमलेली घाण स्वच्छ होईल.
पावसाच्या दिवशी शँपू केल्यानंतर हेअर कंडिशनरचा वापर जरूर करा. यामुळे रूक्ष आणि निस्तेज झालेले केस सिल्की आणि सॉफ्ट दिसतील. आठवड्यातून एकदा अथवा दोनवेळा हेअर कंडिशनरचा जरूर वापर करा.
जर तुम्ही पावसामुळे भिजलात आणि घरी येऊन केस धुवत असाल तर कोमट पाण्याचा वापर करा. यामुळे पावसाच्या पाण्यामुळे होणारे नुकसान टळते.
केस चांगले सुकल्यानंतर केस विंचरून घ्या. तसेच केसांना नारळाचे तेल जरूर लावा. नारळाच्या तेलात थोडासा लिंबूचा रस पिळून ते केसांच्या मुळाशी लावून मसाज केल्यास कोंडा कमी होण्यास मदत होते.
पावसाच्या दिवसांत आठवड्यातून एकदा अथवा दोन वेळा कोमट पाण्याने मसाज केले पाहिजे. यामुळे केस चांगले राहतील. लक्षात ठेवा की पावसाच्या दिवसांत केस ओले राहता कामा नये नाहीतर केसांना वास येतो. तसेच केस मोठ्या प्रमाणात गळतात.
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…