मुंबई : बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित झाले की नेमका कोणता चित्रपट पाहायचा असा प्रश्न प्रेक्षकांना पडतो. त्यामुळे या गोष्टीचा सर्व परिणाम चित्रपटाच्या कलेक्शनवर होतो. गेल्यावर्षी अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ओएमजी २ (OMG २) आणि सनी देओलचा गदर २ (Gadar 2) हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते. परिणामी गदर २ च्या तुलनेत अक्षयच्या OMG २ च्या कलेक्शन कमी प्रमाणात झाले होते. आता पुन्हा एकाच दिवशी दोन बिग बजेट सिनेमे प्रदर्शित होणार असल्याने प्रेक्षकांसमोर प्रश्न निर्माण होणार आहे.
‘पुष्पा’ चित्रपटाच्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्यामुळे ‘पुष्पा २’ (Pushpa 2) सुद्ध रेकॉर्डब्रेक कमाई करेल असा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये अल्लू अर्जुनसह (Allu Arjun) नॅशनल क्रश रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) प्रमुख भूमिकेत झळकेल. ‘पुष्पा २’ आणि ‘सिंघम ३’ (Singham 3) एकाच दिवशी प्रदर्शित झाल्यास कोण बाजी मारणार यावर गेले अनेक महिने चर्चा चालू असतानाच आता या दोन्ही चित्रपटांना टक्कर देण्यासाठी ‘मुंज्या’ चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर मॅडॉक फिल्म्स दिग्दर्शित श्रद्धा कपूरचा (Shraddha Kapoor) ‘स्त्री २’ (Stree 2) चित्रपट येणार आहे.
साधारणत: कोणते चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे वर्षभरापूर्वीच घोषित केले जाते. यापूर्वी रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम ३’ येत्या १५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र नुकत्याच जाहीर केलेल्या तारखेनुसार ‘सिंघम ३’ दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अजय देवगण, दीपिका पदुकोण, रणवीर सिंह, टायगर श्रॉफ, करीना कपूर खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यामुळे ‘सिंघम’ सीरिजचे चाहते या चित्रपटाची आवर्जून वाट पाहत आहेत.
दरम्यान, ‘पुष्पा २’ चित्रपटाचे एडिटिंगचे काही काम अपूर्ण राहिल्याने निर्माते पुष्पा २ ची रिलीज डेट पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अद्यापही याबाबत कोणतीही घोषणा केली नाही. त्यामुळे सध्या तरी बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी बिग बजेट सिनेमे प्रदर्शित होणार असल्याचे चित्र दिसून येते. एकाच दिवशी दोन्ही बिग बजेट सिनेमे बॉक्स ऑफिसवर धडकल्यास बाजी कोण मारणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…
देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…
मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…