मुंबई: भारतात दिवसेंदिवस डायबिटीजच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. हा आजार असल्यास अनेकदा साखर कमी खाण्याचा सल्ला देतात. डॉक्टरांपासून ते हेल्थ एक्सपर्टपर्यंत सर्वच लोक म्हणतात की गोड अथवा साखर खाणे आरोग्यासाठी किती हानिकारक आहे ते मात्र पूर्णपणे साखर सोडणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का?
साखर दोन प्रकारची असते. एक नैसर्गिक आणि दुसरी प्रोसेस्ड. नैसर्गिक साखर आपल्याला फळांच्या माध्यमातून मिळू शकते असे आंबा, अननस, लिची, नारळ.
तर प्रोसेस्ड साखर ही ऊस आणि बीटाच्या रूपातून मिळते. मात्र साखर ही प्रमाणातच खाल्ली पाहिजे. मात्र ती पूर्णपणे सोडणे योग्य आहे का?
अनेकजण असे असतात की जे साखर खाणेच सोडून देतात. मात्र याचे परिणाम त्यांच्या शरीरावर दिसू लागतात. साखर सोडल्याने शरीराच्या फॅटवर परिणाम होतो. साखर खाणे सोडल्यावर थकवा जाणवू लागतो. यामुळे डोकेदुखी, चिडचिडेपणा तसेच थकवा वाटू लागतो.
साखर ही एनर्जीचा स्त्रोत असते. जर तुम्ही हे खाणे सोडले तर अचानक थकवा जाणवू लागतो. साखर खाणे सोडल्यावर एक्स्ट्रा इन्सुलिनचा स्तर कमी होऊ लागतो.