जालना : अवघ्या देशाची नजर लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल (Loksabha Election Result) उद्या म्हणजेच ४ जून रोजी जाहीर होणार आहे. तत्पूर्वी मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी काही दिवसांपूर्वी ४ जूनपासूनच पुन्हा एकदा आंदोलन करणार असल्याचे म्हटले होते. देशभरात निकालाची धामधूम सुरु असतानाच उपोषणाला सुरुवात करणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. मात्र, आतापर्यंत त्यांच्या आंदोलनाला कायम पाठिंबा देत आलेल्या अंतरवाली सराटीतील (Antarwali Sarathi) ग्रामस्थांनीच या उपोषणाला विरोध दर्शवला असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. तसं निवेदन ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्यांकडे सोपवलं आहे. त्यामुळे हा मनोज जरांगेंसाठी मोठा धक्का आहे.
गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात ‘गावात आणि परिसरात जातीय सलोखा बिघडत असल्याने प्रशासनाने या उपोषणास परवानगी देऊ नये’, अशी मागणी केली आहे. अंतरवाली सराटी गावच्या उपसरपंचासह ५ ग्रामपंचायत सदस्यांनी मनोज जरांगे यांच्या गावातील उपोषणाला उघडपणे विरोध केला आहे. याबाबतचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले असून या निवेदनावर ७० गावकऱ्यांच्या सह्या आहेत. त्यामुळे, जरांगे यांचं उपोषण वादात सापडल्याचं दिसून येत आहे.
ज्या गावातून मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी मराठा आरक्षणासाठी लढा दिला, ज्या गावातून या आंदोलनाचा वणवा राज्यभर पेटला, ज्या गावकऱ्यांच्या ताकदीमुळे मनोज जरांगे यांच्या पाठिशी महाराष्ट्रातील मराठा समाज एकटवला, ज्या गावात मनोज जरांगे यांनी ऐतिहासिक सभा घेऊन राज्याचे लक्ष वेधले, ज्या गावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते शरद पवारांपासून राज ठाकरेंपर्यंतचे दिग्गज पोहोचले. त्याच अंतरवाली सराटी गावातील ग्रामस्थांनीच मनोज जरांगे यांच्या आंदोलनास विरोध केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…